पुणे - शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान संघटनेच्यावतीने सोमवारी मुंबईत राजभवनावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चानंतर आंदोलक शेतकऱ्यांचे काही प्रतिनिधी राजभवनावर राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. परंतु, राज्यपाल आपल्या पूर्वनियोजित दौऱ्यामुळे हे निवेदन घेण्यासाठी उपस्थित राहू शकले नाहीत. यावरून राज्यपालांवर टीका केली जात आहे. शेतकऱ्यांना भेटण्यासाठी राज्यपालांकडे वेळ नसल्याचे सांगत त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. या सर्व प्रकरणावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यपालांच्या 'त्या' भूमिकेविषयी अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले.. - राज्यपाल नियुक्त आमदारांची निवड वाद
अजित पवार म्हणाले, पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे राज्यपाल हे शेतकऱ्यांना भेटू शकणार नाहीत, अशी माहिती मला आधीच मिळाली होती. परंतु, भेटण्यासाठी कोणाला प्राधान्य द्यायचे हे त्या व्यक्तीवर अवलंबून असते. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शेतकऱ्यांना राज्यपालांनी भेटायचे ठरवले असते तर ते शक्य झाले असते.