ETV Bharat / state

बारामती : कोरोना नियंत्रणात न आल्यास कडक निर्बंधांचा विचार - अजित पवार - कोरोना नियंत्रण अजित पवार

कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात न आल्यास कडक निर्बंध लागू करण्याचा, विचार करावा लागेल. ज्याठिकाणी कोरोनाचे रुग्ण जास्त आहेत त्या ठिकाणी हॉटस्पॉट घोषित करा. ते करतांना नगरसेवकांना विश्वासात घ्या. ग्रामीण भागात सर्वेक्षण करण्यावर भर द्या, नागरिकांपर्यंत पोहचून कोरोनाबाबत जनजागृती करावी.' असे निर्देश यावेळी अजित पवार यांनी दिले आहे.

अजित पवार
अजित पवार
author img

By

Published : Apr 4, 2021, 3:05 PM IST

बारामती (पुणे) - बारामती तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पुढील काही दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात न आल्यास कडक निर्बंध लागू करण्याचा विचार करावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठकीत दिला आहे. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 'कोरोना विषाणू निर्मूलन आढावा बैठकी’चे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते.

'कोरोनाबाबत जनजागृती करावी'
'सद्यस्थितीत बारामती तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात न आल्यास कडक निर्बंध लागू करण्याचा, विचार करावा लागेल. ज्याठिकाणी कोरोनाचे रुग्ण जास्त आहेत त्या ठिकाणी हॉटस्पॉट घोषित करा. ते करतांना नगरसेवकांना विश्वासात घ्या. ग्रामीण भागात सर्वेक्षण करण्यावर भर द्या, नागरिकांपर्यंत पोहचून कोरोनाबाबत जनजागृती करावी.' असे निर्देश यावेळी त्यांनी दिले आहे.

'लसीकरणाचा वेग वाढवावा'
बारामती शहरात काही नागरिक मास्क वापरताना दिसत नाहीत. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. बाजाराच्या ठिकाणी गर्दी करत आहेत. यावर प्रशासनाने कडक उपाययोजना करुन दंडात्मक कारवाई करावी. सार्वजनिक ठिकाणी तसेच अन्यत्र गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल, याची सर्वांनीच दक्षता घेणे आवश्यक आहे. लग्नसमारंभ आणि अन्य कार्यक्रमासाठी नियमानुसार लोकांची संख्या मर्यादित ठेवणे अपेक्षित आहे, याकडे विशेष लक्ष द्यावे. लसीकरणाचा वेग वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

हेही वाचा-मुख्ममंत्र्यांनी बोलवली मंत्रिमंडळाची तातडीची बैठक; लॉकडाऊनबाबत निर्णय होण्याची शक्यता

हेही वाचा-'महाराष्ट्र कोलमडला तर देश कोलमडेल हे फडणवीसांना माहीत असायला पाहिजे'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.