बारामती - एसटी कर्मचाऱ्यांना आम्ही वेळोवेळी सांगत होतो. तुम्ही सर्व कर्मचारी आपले आहात. तुम्ही कारण नसताना कोणत्याही व्यक्तीच्या चिथावणीखोर भाषणाला, चुकीच्या सल्ल्याला बळी पडू नका, ते तुम्हाला अडचणीत आणतील. मात्र कर्मचारी त्यांच्या मागण्यांवर ठाम राहिल्याने अखेर प्रकरण न्यायालयात गेले, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. ते सुपे येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन कार्यक्रमस्थळी बोलत होते. एसटी संपाच्या ( ST Workers Strike ) संदर्भात काहीजण जाणीपूर्वक समाजात नीटपणे काम चालू असताना त्यात खोडा घालून नव्या समस्या कशा निर्माण होतील. लोकांमध्ये गैरसमज कसा निर्माण होईल, त्यांच्या भावना कशा भडकवता येईल, असे प्रयत्न करत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar ) यांनी सांगितले.
हेही वाचा - मुंडेनंतर गणेश नाईक! महिलेचे नाईक यांच्याविरोधात गंभीर आरोप