पुणे - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून छत्रपती संभाजीराजे ( Chhatrapati Sambhajiraje ) येत्या 26 नोव्हेंबरपासून उपोषणाला बसणार आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Dy CM Ajit Pawar ) यांना विचारलं असता ते म्हणाले की, विलासराव देशमुख मुख्यमंत्री असल्यापासून हे चाललं आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री ( Prithviraj Chavhan as CM ) असताना मराठा समाजाला 16 टक्के आणि मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्यात आलं. मात्र, परत आरक्षण टिकलं नाही. त्यांनंतर आयोग स्थापन करण्यात आलं. छत्रपती संभाजीराजे यांना दुसरा कार्यक्रम होता म्हणून ते गेले. त्यांना मी आवाहन करतो की उपोषण करू नका. मराठा समाजाला आरक्षण ( Maratha Reservation ) मिळालं पाहिजे हीच महाविकास आघाडी सरकारची भूमिका असून आरक्षणाचा प्रश्न सुटायचा असेल तर केंद्र सरकारने हस्तक्षेप करायला हवा, असे यावेळी पवार म्हणाले. ( Ajit Pawar to Chhatrapati Sambhajiraje )
हे कुठेतरी थांबायला हवं -
राज्यात सध्या भाजप नेते किरीट सोमैया आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात दिवसंदिवस आरोप प्रत्यारोप होत आहे. यावर पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, या राज्याची संस्कृती अशी नव्हती. आम्ही सुधाकरराव नाईक, विलासराव देशमुख, मनोहर जोशी, पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्री पदाचा काळ पाहिला आहे. तेव्हा असं होतं नव्हतं. आत्ता प्रत्येकाने गांभीर्याने घाययला हवं. दुर्दैवाने असं घडत नाही. हे कुठंतरी थांबायला हवं, असं देखील यावेळी पवार म्हणाले.