पुणे Delivery Boy molested girl : डिलिव्हरी बॉयनं 26 वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. मोबाईल चार्जिंगच्या बहाण्यानं संबंधित डिलिव्हरी बॉयनं घरात घुसून फिर्यादीकडे शारीरिक सुखाची मागणी केल्याचा धक्कादाय प्रकार समोर आला आहे. हा सगळा प्रकार वाकडेवाडी येथील उच्चभ्रू सोसायटीत घडला. याप्रकरणी एका तरुणीनं फिर्याद दिली असून त्यानुसार डिलिव्हरी बॉयविरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीकडं पैशांची मागणी : याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादीनं एका वेबसाईटवरून सॅनिटरी नॅपकिन मागवले होते. सॅनिटरी नॅपकिन घरी आल्यानंतर पार्सलची तपासणी केली असता सॅनिटरी नॅपकिनचं पॅकिंग फुटल्याचं आढळून आलं. दरम्यान, फिर्यादीनं आपल्या मोबाईलवरून संबधित वेबसाईटला फाटलेल्या सॅनिटरी नॅपकिनच्या पॅकिंगचा फोटो पाठवला. त्यानंतर डिलिव्हरी बॉय नवीन सॅनिटरी नॅपकिन घेऊन आला. तेव्हा डिलिव्हरी बॉयनं फिर्यादीकडं पैशांची मागणी केली असता, फिर्यादीनं डिलिव्हरी बॉयला संबंधित कंपनीशी बोलण्यास सांगितलं.
डिलिव्हरी बॉयविरोधात गुन्हा दाखल : त्यावेळी डिलिव्हरी बॉयनं फिर्यादीकडं मोबाईल चार्जिंगला लावण्याची विनंती केली. तेव्हा घरात घुसल्यानंतर डिलिव्हरी बॉयनं फिर्यादीकडं पाहून अश्लील हावभाव करण्यास सुरवात केली. तसंच फिर्यादीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. ‘तुम सेक्स करोगी' असं म्हणत डिलिव्हरी बॉयनं तरुणीचा विनयभंग केला. याप्रकरणी खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर : पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून विविध गुन्ह्यात वाढ होताना पाहायला मिळत आहे. विविध गुन्हे शहरात घडत आहेत. अशातच पुण्यातील वाकडेवाडीतील एका उच्चभ्रू सोसायटीत धक्कादायक प्रकार घडल्यानं सगळीकडे खळबळ उडाली आहे. सॅनिटरी नॅपकिन घेऊन घरी आलेल्या डिलिव्हरी बॉयनं 26 वर्षीय तरुणीकडं सेक्सची मागणी केलीय. त्यामुळं महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा -