ETV Bharat / state

बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रातील तंत्रज्ञानाने तेलंगणाचे कृषीमंत्री प्रभावित - तेलंगणा कृषीमंत्री बारामती भेट

आपला देश कृषी प्रधान आहे. शेती विषयक तंत्रज्ञान आणि नवीन संकल्पनांची देवाण-घेवाण राज्ये एकमेकांशी करत असतात. आज तेलंगणाच्या कृषी मंत्र्यांनी बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली.

S. Niranjan Reddy
एस. निरंजन रेड्डी
author img

By

Published : Nov 5, 2020, 7:21 PM IST

Updated : Nov 5, 2020, 7:49 PM IST

पुणे - तेलंगणा राज्याचे कृषीमंत्री एस. निरंजन रेड्डी यांनी बारामतीतील अ‌ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली. त्यांच्यासोबत तेलंगणाचे कृषी सचिव बी. जनार्दन रेड्डी, कृषी संचालक एल. वेंकटराम रेड्डी, सहसंचालक व्ही. सरोजिनी देवी, उपसंचालक एम.व्ही. मधुसूदन, अपेडाचे उपमहासंचालक नागपाल लोहकरे, संशोधन संचालक डॉ. ए. भगवान, उपसंचालक के. वेणुगोपाल होते. कृषी विज्ञान केंद्रातील तंत्रज्ञानाच्या प्रसाराचे काम पाहून हे शिष्टमंडळ प्रभावित झाले.

तेलंगणाचे कृषीमंत्री एस. निरंजन रेड्डी यांनी बारामतीला भेट दिली

अ‌ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी या शिष्टमंडळाचे स्वागतकरून त्यांना कृषीतंत्रज्ञान प्रसाराच्या कामाची माहिती दिली. तेलंगणाचे कृषीमंत्री एस. निरंजन रेड्डी यांनी पुणे जिल्ह्यातील भौगोलिक माहिती, येथील मृदा व पाण्याची स्थिती जाणून घेतली. कृषी विज्ञान केंद्रातील जिवाणू प्रयोगशाळा, माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळेची पाहणी केली. भाजीपाला उच्च गुणवत्ता केंद्रालाही त्यांनी भेट दिली. मधुमाशीपालन व शेती उत्पादन वाढण्यासाठी त्याच्या उपयोगाबाबत त्यांनी तज्ञांकडून अधिक माहिती घेतली.

पशु अनुवंश सुधार गुणवत्ता केंद्राला भेट देऊन येथे होणाऱ्या देशी गायी-म्हशींच्या संशोधनाची माहिती तेलंगणाच्या शिष्टमंडळाने घेतली. सांगवीतील 450 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या नाथसन फार्मर्स कंपनीलाही त्यांनी भेट दिली. कंपनीचे अध्यक्ष नितिन तावरे यांनी त्यांना कंपनीची माहिती दिली. बारामती खरेदी-विक्री संघ, दौंडच्या वासुंदे येथील केळी व डाळिंब निर्यात फार्मला देखील रेड्डी यांनी भेट दिली. बारामतीसारखा तंत्रज्ञानाचा अवलंब तेलंगणामध्ये करण्याचा संकल्पही त्यांनी केला.

देशातील ज्या राज्यांनी शेतीच्या संदर्भात नवनवीन प्रयोग केले आहेत. त्या ठिकाणांना भेट देण्याचा उपक्रम रेड्डी यांनी सुरू केला आहे. महाराष्ट्रानंतर तेलंगणाचे कृषी शिष्टमंडळ कर्नाटक, उत्तर प्रदेशला भेट देणार आहे. कृष्णा-गोदावरीच्या सिंचन प्रकल्पांचा उपयोग करून तेलंगणाही कृषी क्षेत्रात बदल करत असल्याचे रेड्डी यांनी सांगितले.

Last Updated : Nov 5, 2020, 7:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.