पिंपरी-चिंचवड (पुणे) - केतकी चितळेच्या आक्षेपार्ह लिखाणाच्या पोष्टवर देहू संस्थानने नाराजी व्यक्त केली असून तुका म्हणे शब्दांवर आक्षेप घेतला आहे. या प्रकरणी देहू संस्थानने देहूरोड पोलिसात पत्र दिले असून केतकीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तुका म्हणे ही संत तुकाराम महाराजांची नाममुद्रा असून महाराजांनी लिहिलेल्या सर्व अभंगाची स्वाक्षरी आहे, असे पोलिसांना देण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आलंय.
Dehu Sansthan on Ketki Chitle - केतकीच्या 'त्या' पोष्टवर देहू संस्थानने घेतला आक्षेप; गुन्हा दाखल करण्याची मागणी
श्री संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आहे. तुका म्हणे ही संत तुकाराम महाराजांची नाममुद्रा असून महाराजांनी लिहिलेल्या सर्व अभंगाची स्वाक्षरी आहे, असे पत्रात म्हटलं आहे. त्यामुळं तुकोबाच नव्हे तर देशातील इतर संतांच्या नावाचा वापर करू नये. असे लेखन करत असेल तर त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे देहूसंस्थांनने म्हटले आहे.
केतकीच्या 'त्या' पोष्टवर देहू संस्थानने घेतला आक्षेप; गुन्हा दाखल करण्याची मागणी
पिंपरी-चिंचवड (पुणे) - केतकी चितळेच्या आक्षेपार्ह लिखाणाच्या पोष्टवर देहू संस्थानने नाराजी व्यक्त केली असून तुका म्हणे शब्दांवर आक्षेप घेतला आहे. या प्रकरणी देहू संस्थानने देहूरोड पोलिसात पत्र दिले असून केतकीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तुका म्हणे ही संत तुकाराम महाराजांची नाममुद्रा असून महाराजांनी लिहिलेल्या सर्व अभंगाची स्वाक्षरी आहे, असे पोलिसांना देण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आलंय.
Last Updated : May 15, 2022, 5:05 PM IST