ETV Bharat / state

मुक्ताबाई अंतर्धान समाधी सोहळा; संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरास लक्षवेधी फुलांची सजावट - dnyaneshwar-mauli-mausoleum aalandi

माऊली मंदिरात केलेली ही सजावट पाहण्यासाठी दरवर्षी असंख्य भाविक याठिकाणी दाखल होतात. पण यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे यंदा भाविकांना घरातूनच दर्शन घ्यावं लागत आहे.

फुलांची आरास
फुलांची आरास
author img

By

Published : Jun 5, 2021, 11:17 AM IST

Updated : Jun 5, 2021, 11:49 AM IST

आळंदी (पुणे) - संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी मंदिरात मुक्ताबाई अंतर्धान समाधी दिन सोहळ्यानिमित्त माऊलींच्या गाभाऱ्यात लक्षवेधी पुष्प सजावट करण्यात आली. परंपरेने श्रींची पावमान पूजा दूध आरती नित्यनैमित्तिक महाप्रसाद अधिक कार्यक्रम झाले. मुक्ताई मंदिरातदेखील पुष्प सजावट व पूजा अधिक कार्यक्रम करण्यात आले असल्याची माहिती मंदिराचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी दिली.

संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरास लक्षवेधी फुलांची सजावट

बाजीराव नाना महाराज चांदीले यांची कीर्तन सेवा
श्री संत कबीर महाराज मठाच्या परंपरेतील चौथे सत्पुरुष रामदास महाराज यांचे 73 व्या पुण्यस्मरण दिन आहे. या दिनानिमित्त हरिभक्त परायण बाजीराव नाना महाराज चांदीले यांची कीर्तन सेवा झाली. यावेळी सद्गुरू महाराज यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले.

कोरोनामुळे भक्तांना घरातूनच दर्शन
मुक्ताबाई अंतर्धान समाधी दिन सोहळ्यानिमित्त वीणा मंडप व समाधी मंदिर मोगरा व इतर रंगेबिरंगी फुलांनी खास सजवण्यात आले आहे. समाधी मंदिरातील दृश्य अत्यंत विलोभनीय असून प्रत्येक सणानिमित्त माऊलींच्या गाभाऱ्याला फुलांची सजावट केली जाते. माऊली मंदिरात केलेली ही सजावट पाहण्यासाठी दरवर्षी असंख्य भाविक याठिकाणी दाखल होतात. पण यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे यंदा भाविकांना घरातूनच दर्शन घ्यावं लागत आहे. देवस्थानं बंद असले तरी मंदिरांमध्ये पूजा, आरास विधी नित्यनेमाने सुरू आहे.

Last Updated : Jun 5, 2021, 11:49 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.