पुणे : सध्या तरुणांमध्ये सोशल मीडिया आणि बॉडी बिल्डिंग याबाबत खूप आकर्षण आहे. रिल्स बनविण्यासाठी पाहिजे तशी कसरत करताना देखील आपल्याला विविध सोशल मीडिया अकाऊंट वर पाहायला मिळतात. पण आपल्याला जर म्हटले की एका 78 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने चक्क अवघड समजल्या जाणाऱ्या डेडलिफ्ट पावर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये घवघवीत यश मिळवले ( 78 Year Old Man Won Competition ) आहे.
वयाच्या 78 व्या वर्षी जिंकली स्पर्धा : पुण्यातील राजाराम पुल येथील कर्वेनगर येथे राहणाऱ्या 78 वर्षीय श्रीकांत अडकर यांनी आपल्या वयावरती मात करून मागच्या महिन्यात आयोजित पुणे जिल्हा डेडलिफ्ट जिल्हास्तरीय पावर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये डेडलिफ्ट प्रकारात त्यांनी घवघवीत यश प्राप्त केले ( Shrikant Adkar Lifted 50 kg ) आहे. ते ही 78 व्या वर्षात 50 किलो वजन उचलून त्यांनी अजूनही मी जवान असल्याचे सिद्ध केल ( Deadlift Powerlifting Competition ) आहे. पुणे जिल्हा डेडलिफ्ट जिल्हास्तरीय पावर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये डेडलिफ्ट प्रकारात वरिष्ठ ग्रुपमध्ये श्रीकांत अडकर यांनी भाग घेत ही स्पर्धा जिंकली आहे.
बॉडी बिल्डिंगचे व्यायाम : मला पहिल्यापासूनच व्यायामाची आवड आहे. हीच आवडली वयाच्या 78व्या वर्षे देखील जोपासली आहे. मी रेगुलर बॉडी बिल्डिंगचे व्यायाम करत असतो. आज देखील माझे शरीर घोटीव आहे. जेव्हा मला काळाल की अशी स्पर्धा होणार आहे. तर त्या स्पर्धासाठी मी तयारी केली. आज मी ही स्पर्धा जिंकल्याचा आनंद असल्याचे यावेळी अडकर यांनी सांगितले.
50 किलो वजन उचलले : कर्वेनगर येथील सोमण क्लबचे राजहंस मेहंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली वेटलिफ्टिंगची तयारी करत होतो. माझे वय आणि उत्साह पाहून त्यांनी मला या स्पर्धेमध्ये भाग घेण्याचा सल्ला दिला. त्यांनी माझ्याकडून पावर लिफ्टिंगमधील डेडलिफ्ट या प्रकारचे प्रॅक्टिस करून घेतली. खरंतर या वयामध्ये डेडलिफ्टिंग सारखा अवघड प्रकार करणे चांगली गोष्ट नसते. कारण की वयानुसार तुमच्या मणक्यावरती हाडांवरती परिणाम झालेला असतो त्याची झीज झालेली असते. मात्र माझ्याकडून योग्य व्यायाम राजहंस मेहंदळे यांनी प्रॅक्टिस करून घेतली. आणि या स्पर्धेमध्ये मी तब्बल 50 किलो एवढे वजन डेडलिफ्ट प्रकारामध्ये उचलले आणि विजेता झालो. असे देखील यावेळी अडकर यांनी सांगितले.
शरीरसौष्ठव किताब जिंकला : अडकर यांनी तरूणपणी पुणे श्री सारखे अनेक शरीरसौष्ठव किताब जिंकले आहेत. मी कधी व्यसन केले नाही. नेहमी स्वतःच्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष दिले. खाण्यापिण्याच्या झोपण्याच्या सगळ्या सवयी वेळोवेळी पाळल्या आणि पहिल्यापासून व्यायामाची आवड जोपासली. माझे वडील स्वतः पोलीस अधिकारी होते त्यामुळे आमच्या घरामध्ये व्यायामाची आवड सगळ्यांनाच निर्माण झाली. आपण जर आपल्या आरोग्याची काळजी घेतली तर आपण वयाच्या 80व्यावर्षी देखील तंदुरुस्त निरोगी राहू शकता असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.