ETV Bharat / state

पुण्यातील वारजे पुलाखाली बॅगेत आढळला मृतदेह - murder in warje malwadi

वारजे माळवाडी येथील पुलाखाली एका बॅगेत पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. घटनेची माहिती मिळताच वारजे माळवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मात्र, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मृतदेहाचे अजूनपर्यंत ओळख पटलेली नाही.

पुण्यातील वारजे पुलाखाली आढळला बॅगेत कोंबलेला मृतदेह
author img

By

Published : Nov 21, 2019, 7:55 PM IST

पुणे - वारजे माळवाडी येथील पुलाखाली एका बॅगेत पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. घटनेची माहिती मिळताच वारजे माळवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मात्र, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मृतदेहाचे अजूनपर्यंत ओळख पटलेली नाही.

हेही वाचा - किरकोळ कारणावरुन केडगावात दोन गटात बाचाबाची

वारजेतील स्मशानभूमीजवळील पुलाखाली काही लोक गेली असता, त्यांना तेथे उग्र वास येऊ लागला. त्यांनी याची माहिती पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिली. ही माहिती मिळताच वारजे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बॅगेची तपासणी केली असता, त्यात एक पुरुषाचा मृतदेह आढळून आला.

अग्निशामक व पोलिसांनी मृतदेह बागेतून बाहेर काढून शविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला आहे. मृताची ओळख पटलेली नसून ओळख पटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक कदम म्हणाले, मृतदेह 32 ते 35 वयोगटातील आहे. खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह बॅगेत घालून पुलावरून टाकला असण्याची शक्यता आहे. अधिक तपास वारजे पोलीस करत आहेत.

हेही वाचा - नाशिकमध्ये एटीएम फोडीचे सत्र पुन्हा सुरू; कारंजातील 'पीएनबी'चे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

Intro:वारजे परिसरातील एका पुलाखाली बॅगेत कोंबलेल्या अवस्थेत सापडला पुरुषाचा मृतदेह..पोलीस घटनास्थळी दाखल.. ओळख पटविण्याचे काम सुरू...

पुण्यातील वारजे माळवाडी भागातील पुलाखाली एका बॅगेत पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे.
घटनेची माहिती मिळताच वारजे माळवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजेतील
स्मशान भूमीजवळील पुलाखाली काही व्यक्ती गेल्या असता त्यांना येथील उग्र वास येऊ लागला. त्यांनी याची माहिती पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिली. ही माहिती मिळताच वारजे पोलिस येथे दाखल झाले. त्यांनी बॅगेची तपासणी केली असता त्यात एक पुरुषाचा मृतदेह आढळून आला.

हि माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी हे पाहण्यासाठी तोबा गर्दी केली आहे. अग्निशामक व पोलिसांनी बागेतून बाहेर काढून शविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला आहे. मयताची ओळख पटलेली नसून ओळख पटविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

वारजे माळवाडी पोळीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक कदम म्हणाले की , मृतदेह ३२ ते ३५ वयोगटातील आहे. खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह बॅगेत घालून पुलावरून टाकला असण्याची शक्यता आहे. अधिक तपास वारजे पोलीस करत आहेत. Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.