ETV Bharat / state

DCM Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रूग्णालयात घेतली बंडातात्या कराडकरांची भेट

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये जाऊन घेतली बंडातात्या कराडकर यांची आज भेट घेतली. कीर्तनकार ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांना पॅरेलिसिसचा सौम्य झटका आला होता त्यांनी उपचारासाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Jan 14, 2023, 10:59 PM IST

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये जाऊन घेतली बंडातात्या कराडकर यांची भेट घेतली. यावेळी आजारी असतानाही बंडातात्या कराडकर हे रुग्णालयात ज्ञानेश्वरी वाचत असल्याचे दिसून आले. कीर्तनकार ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांना पॅरेलिसिस म्हणजेच पक्षाघाताचा सौम्य झटका आला होता. यादरम्यान त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये पुढील उपचार व तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे.

पुढील उपचारासाठी पुण्यात : ह. भ. प बंडातात्या कराडकर मागच्या बुधवारी रात्री पिंपरद येथील कार्यालयात मुक्कामासाठी होते. काल सकाळी सात वाजता त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने फलटण येथील जे. टी. पोळ यांच्या निकोप हॉस्पिटलमध्ये त्यांना हलवण्यात आले. त्यांना पॅरेलिसिसचा सौम्य झटका आला होता. ब्लड प्रेशर व शुगर वाढली होती. डॉक्टर पोळ व त्यांच्या टीमने सर्व तपासण्या करून औषधोपचार केले. काल दिवसभर व रात्री डॉक्टरांच्या देखरेखेखालीच होते. आणि दुसऱ्यादिवशी सकाळी मेंदूच्या रक्तवाहिन्यांची तपासणी (डीएस ए) साठी त्यांना पुण्याला हलवण्यात आले असून त्यांना दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बंडातात्या कराडकर चर्चेत : हभप बंडातात्या कराडकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ कीर्तनकार आहेत. तसेच ते समाज प्रबोधनकारही आहेत. त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसाठी आंदोलन करण्याचा त्यांनी इशारा दिला होता.यापूर्वी गोहत्या बंदी कायद्यासाठी त्यांनी चक्क मुख्यमंत्र्यांना अडवले होते. गोहत्या बंदी कायदा महाराष्ट्रात लागू करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा रोखण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार होते आणि पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.

पद्मश्रीची शिफारस होती नाकारली : हभप बंडातात्यांनी १९९६ मध्ये व्यसनमुक्त युवक संघाची स्थापना केली होती. व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांना व्यसनमुक्त करण्यासाठी ही संस्था काम करते. गेल्या वीस वर्षांपासून बंडातात्यांचे कार्य सुरू आहे. त्याशिवाय युवकांना इतिहास माहिती व्हावा म्हणून ते गडकिल्ल्यांवर प्रतापी संस्कार सोहळ्याचे आयोजन करतात. जवळपास २५ वर्षांपासून हा उपक्रम सुरुच आहे.२०१९ मध्ये 'पद्मश्री' पुरस्कारासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यासाठी बंडातात्या कराडकरांकडून त्यांची माहिती मागवली. त्यावर आपण कोणतााही पुरस्कार स्वीकारत नाही, असे सांगत त्यांनी स्वतःच्या कार्याची माहिती देण्यास नकार दिला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.