दौंड (पुणे) - शहरात घरगुती गॅसचा काळा बाजार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना रंगेहाथ पकडले. हे पाचही जण भरलेल्या गॅसच्या टाक्यांमधून गॅस काढून काळ्या बाजाराने विकत होते. तर यासोबतच पोलिसांनी 37 भरलेल्या गॅसच्या टाक्यांसह 33 रिकाम्या टाक्या जप्त केल्या.
नेमका काय प्रकार?
भरलेल्या घरगुती एका कंपनीच्या गॅस सिलिंडरमधुन दुसऱ्या रिकाम्या गॅसच्या टाकीमध्ये मशीनच्या सहाय्याने धोकादायक पध्दतीने गॅस भरताना पोलिसांनी आरोपींना रंगेहाथ पकडले. हा प्रकार दौंड शहरात गॅस वितरण करणाऱ्या वितरकांकडून शहरातील यादव वस्तीजवळ सुरू होता. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी आणि त्यांच्या टीमने केली.
हेही वाचा - 'रिकामी सिलिंडर घेऊन रस्त्यावर उतरणाऱ्या हेमा मालिनी, स्मृती इराणी आता कुठे आहेत?'
याप्रकरणी दौंड पोलिसांनी दोन गॅस पुरवठा करणारी वाहने आणि चार 5 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 9 लाख 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर यामध्ये वाहने आणि 37 भरलेल्या टाक्या आणि 33 रिकाम्या गॅसच्या टाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच संबंधित टोळीवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आधीच घरगुती गॅसच्या वाढत्या दरामुळे ग्राहक हैराण झाले आहेत. त्यात या गॅसच्या काळाबाजार केल्याच्या प्रकाराने आणखी भर पडली आहे.