आंबेगाव (पुणे) - ऊसतोड कामगाराच्या आठ वर्षीय चिमुकल्या मुलीचा पाय घसरुन विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तालुक्यातील निरगुडसर येथे दोन महिन्यांपासून ऊसतोड कामगार वास्तव्य करत आहे. याच ठिकाणी ही घटना घडली. तनुजा रामेश्वर पवार असे मृत मुलीचे नाव आहे.
तिला पोहता येत नसल्याने...
विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची ऊसतोडणीसाठी पाच सहा कुटुंब वास्तव्यास आहे. आज (शुक्रवारी) सकाळी ऊसतोड कामगार ऊस तोडून ट्रॉलीत भरण्याचे काम करत होते. त्यावेळी पवार यांची तीन लहान मुले राहात्या झोपडीजवळ खेळत होती. त्यावेळी बाजुलाच असणाऱ्या विहिरीच्या कठड्यावरुन आठ वर्षीय तनुजाचा पाय घसरला. विहिरीला सुरक्षित कठडे नव्हते. तसेच विहिरीच्या पाण्याची पातळी जास्त असल्याने आणि तिला पोहायला येत नसल्याने तिचा पाण्यात बुडुन मृत्यु झाला.
हेही वाचा - मुथुट फिनकॉर्प दरोडा : शाखा व्यवस्थापकच निघाला आरोपी, दीड कोटींचा मुद्देमाल जप्त
यानंतर स्थानिक नागरिक आणि ऊसतोड कामगारांच्या मदतीने तनुजाला तत्काळ बाहेर काढण्यात आले. तिला ग्रामीण रुग्णालय घोडेगाव येथे उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.