ETV Bharat / state

मैत्रिणींवर छाप पाडण्यासाठी 'तो' बनला गाड्या चोर; भामट्याला दत्तवाडी पोलिसांनी केले अटक - दुचाकी चोर पुणे दत्तवाडी

सौरभ दत्तात्रय चोरगे हा बारावीपर्यंत शिकला आहे. टाळेबंदीपूर्वी तो एका कपड्याच्या दुकानात काम करत होता. पण, टाळेबंदी काळात त्याची नोकरी गेली. आरोपीच्या अनेक मैत्रिणी आहेत, त्यांच्यावर छाप पाडण्यासाठी आणि त्यांना दुचाकीवर घेऊन फिरण्यासाठी त्याने दुचाकी चोरण्यास सुरुवात केली.

पुणे
पुणे
author img

By

Published : Dec 6, 2020, 5:26 PM IST

पुणे - मैत्रिणींवर छाप पाडण्यासाठी आणि त्यांना फिरविण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या तरुणाला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सौरभ दत्तात्रय चोरगे (वय २०, रा. आंबेगाव पठार) असे अटक केलेल्या तरुणाचा नाव आहे. टाळेबंदीमध्ये नोकरी गेल्यानंतर त्याने दुचाकी चोरण्याचा उद्योग चालू केला होता.

माहिती देताना पोलीस अधिकारी
दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांकडून गस्त सुरू होती. त्यावेळी पोलीस हवालदार कुंदन शिंदे व सागर सुतकर यांना बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, एक तरुण चोरीची दुचाकी घेऊन शिवदर्शन परिसरातील वसंतराव बागुल उद्यान कमानीपासून पुढे असलेल्या पुलावर थांबला आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने, उपनिरीक्षक स्वप्निल लोहार यांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्यावेळी त्याने त्याचे नाव चोरगे असे सांगितले. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली. त्यावेळी ती दुचाकी चोरीची असल्याचे आढळून आले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर दत्तवाडी आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेल्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
टाळेबंदीत नोकरी नाही म्हणून बनला चोर
सौरभ दत्तात्रय चोरगे हा बारावीपर्यंत शिकला आहे. टाळेबंदीपूर्वी तो एका कपड्याच्या दुकानात काम करत होता. पण, टाळेबंदी काळात त्याची नोकरी गेली. आरोपीच्या अनेक मैत्रिणी आहेत, त्यांच्यावर छाप पाडण्यासाठी आणि त्यांना दुचाकीवर घेऊन फिरण्यासाठी त्याने दुचाकी चोरण्यास सुरुवात केली. आतापर्यंत मैत्रिणींसाठी पाच दुचाकी चोरल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी त्याच्याकडे आणखी तपास सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.