ETV Bharat / state

उन्हाळ्यात सुद्धा धुक्यात लपटतोय नाणेघाट, पर्यटकांना येतोय पावसाळी सौंदर्याचा अनुभव

सह्याद्रीच्या रांगात वसलेल्या जीवधान किल्ला आणि नाणेघाटात रात्री आणि सकाळी वेगळ्या प्रकारचे सौंदर्य पाहायला मिळते. या ठिकाणी उन्हाळ्यात सुद्धा रोज सकाळी डोंगर कड्यावर धुके अवतरल्यामुळे स्वर्गासारखा सुंदर नजारा पाहायला मिळतो.

नाणेघाटातील धुक्याचे छायाचित्र
author img

By

Published : Apr 7, 2019, 7:48 PM IST

Updated : Apr 8, 2019, 1:22 AM IST

पुणे - जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर वसलेला जीवधान आणि नाणेघाट पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, आता या ठिकाणी भर उन्हाळ्यात सुद्धा कापूस पिंजल्याप्रमाणे धुक्याचे दर्शन पाहायला मिळत आहे.

नाणेघाटातील धुके

सह्याद्रीच्या रांगात वसलेल्या जीवधान किल्ला आणि नाणेघाटात रात्री आणि सकाळी वेगळ्या प्रकारचे सौंदर्य पाहायला मिळते. या ठिकाणी उन्हाळ्यात सुद्धा रोज सकाळी डोंगर कड्यावर धुके अवतरल्यामुळे स्वर्गासारखा सुंदर नजारा पाहायला मिळतो. या ठिकाणचे सौदर्य पाहण्यासाठी पावसाळ्यात नेहमीच पर्यटकांची गर्दी होत असते. मात्र, आता उन्हाळ्यात सुद्धा या ठिकाणी पांढऱ्या शुभ्र रजई सारखे धुके पडत आहे. त्यामुळे धुक्यात लपेटलेला जीवधन किल्ला आणि नानाचा अंगठा भर उन्हाळ्यात पावसाळी सौंदर्याचा अनुभव देत आहे.

सध्या सर्वत्र कडाक्याचे उन्ह पडत आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात देखील या धुक्याच्या दृश्यामुळे किल्ल्यावर आणि नाणेघाट फिरायला येणाऱ्या पर्यटकाचे मन सौंदर्य भरुन जात आहे. त्यामुळेच पावसाळी हंगामात निसर्गाने भरभरून दिलेल्या या परिसरात आता उन्हाळ्यातही अनेक पर्यटक हा नजारा अनुभवण्यासाठी येथे मुक्कामी येत आहेत. निसर्गाने या परिसराला खुप काही दिल आहे. मात्र येथे भौतिक सुविधांची खूपच कमतरता आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पण असे असले तरी येथील स्थानिक आदिवासी येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांचे घरगुती पद्धतीने अल्प दरात पाहुणचार करत असतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या हंगामात सुद्धा याठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने भेटी देण्यासाठी येत आहेत.

Intro:Anc__सह्याद्री पर्यत रांगातुन नटलेलं सौदर्य पाऊसाळ्यासह उन्हाळ्यातही जुन्नर तालुक्यातील नाणेघाटात पहायला मिळतं सहयाद्रीच्या रांगात वसलेल्या पुणे जिल्ह्यातील जीवधान किल्ला आणि नाणेघाटात रात्री आणि सकाळी एक वेगळं सौंदर्य मन भरुन टाकणारं असतं त्यात जमिनीवर अवतरलेलं स्वर्ग म्हणावं असा हा सुंदर नजारा पहायला मिळतो चला पहावुयात ETV BHARAT चा निसर्गावरचा स्पेशल रिपोर्ट

Open file...डोंगर कडा जमिनीवरील स्वर्ग...नाणेघाट..with music.

Vo__जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या सरहद्दीवर वसलेला जीवधान आणि नाणेघाट पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे तो या ठिकाणच्या धबधब्यामुळे आणि धुक्यामुळे... पण यातलं धुक्याच दर्शन चक्क भर उन्हाळ्यात पाहायला मिळालं.हे आगळ वेगळं कापूस पिंजल्या सारख पांढऱ्या शुभ्र रजई सारख दिसणार धुकं आणि या धुक्यात लपेटलेला जीवधन किल्ला आणि नानाचा अंगठा__भर उन्हाळ्यात असं पावसाळी सौंदर्य यापूर्वी कधीही न पाहिलेलं याचा सौंदर्याचा अनुभव स्थानिक नागरिक रोजच घेतात.

Byte-सुभाष आढारी,स्थानिक

Vo__कडाक्यात उन्हात दिवसाची सुरुवात करणारं हे सौंदर्य मन भरुन टाकतं पण इथली रात्रही काही वेगळी नसते....त्यात आमावस्या असेल तर काळ्या कुट्ट अंधारात इथलं आकाश आणि आकाशातील आकाशगंगा जीवधनला स्पर्श केल्याचा आभास करते...हा सगळा नजरा ट्रेकर आणि निसर्ग प्रेमी अनुभवायला येत असतात आणि त्यांचे अनुभवही शेअर करतात

Byte__सुनील गुंजाळ__ट्रेकर

Vo__ पावसाळी हंगामात निसर्गानं भरभरून दिलेले हे सौंदर्य अनेकजण अनुभवतात पण उन्हाळ्यात इथली मजा अनुभवायलाही अनेकजण इथं मुक्कामी येतात.

Byte__राधाकृष्ण गायकवाड__निसर्गप्रेमी

Vo__निसर्गाने या परिसराला खुप काही दिलय मात्र इथं तश्या भौतिक सुविधा खूपच कमी आहेत मात्र स्थानिक आदिवासीकडे आपल्याला घरगुती पद्धतीने सर्व पाहुणचार अल्प दरात अनुभवायला मिळतो

Byte__सुमन आढारी__स्थानिक महिला

End vo__सह्याद्रीचं हे आगळ वेगळं आणि रांगडं सुंदर रुप तुम्हाला अनुभवाचे असेल तर नक्की तुम्ही या ठिकाणी भेट द्याBody:स्पेशल पँकेज स्टोरी....Conclusion:
Last Updated : Apr 8, 2019, 1:22 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.