ETV Bharat / state

'डाकिन्नम भिमाशंकरम्' भाविकांचे श्रद्धास्थान असलेले स्वयंभू देवस्थान - डाकिन्नम भिमाशंकरम् मंदिर गोष्ट

देशभरात हिंदू धर्मीय लोक महाशिवरात्री मोठ्या उत्साहाने साजरी करतात. 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रातील भिमाशंकर, परळी-वैजनाथ, त्र्यंबकेश्वर, औंढा नागनाथ व घृष्णेश्वर या देवस्थानी तसेच इतर विविध ठिकाणी असलेल्या शिवमंदिरात दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून शिवभक्त दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात.

Bhimashankar
भीमाशंकर
author img

By

Published : Mar 11, 2021, 9:45 AM IST

पुणे - महाशिवरात्री निमित्ताने ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करत असतात. यंदा मात्र कोरोना संकटामुळे महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग भाविकांसाठी बंद असणार आहेत. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग पुणे जिल्ह्यातील भिमाशंकर येथे आहे. या ठिकाणी श्रावणी सोमवार, महाशिवरात्र या महत्त्वांच्या दिवसांसोबतच वर्षभर भाविक दर्शनासाठी येतात. मात्र, गेले पूर्ण वर्ष याला अपवाद ठरले आहे. पुणे जिल्ह्याच्या दुर्गम भागात वसलेल्या या भिमाशंकर ज्योतिर्लिंगांचा महाशिवरात्रीनिमित्त आढावा...

भीमाशंकर ज्योतिर्लिंग

काय आहे अख्यायिका -

भिमा नावाच्या दैत्याचा वध केल्यानंतर भिमाशंकर येथे शिवलिंगाची स्थापना झाली. याच भिमाशंकरचे दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करत असतात. सह्याद्री पर्वत रांगांच्या कुशीत वसलेले हे भिमाशंकर देवस्थान बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि महाराष्ट्रात असलेल्या पाच ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हिरवगार घनदाट वनराईने नटलेले वातावरण, पांढ-या शुभ्र धुक्यात वेढलेला हा परिसर भाविकांना आणि पर्यटकांना आकर्षीत करत असतो. महाशिवरात्री व श्रावणी सोमवारांच्या दिवशी भाविकांच्या येथे लांबचलांब रांगा लागलेल्या असतात.

भाविकांना सुविधा पुरवण्यात अडचणी -

भिमाशंकरला 'डाकिन्नम भिमाशंकरम्' या नावानेही ओळखले जाते. हे देवस्थान स्वयंभू असल्याची अख्यायिका सांगितली जाते. त्रेतायुगात शिवशंकराचा भक्त असलेला आणि भगवान शिवशंकराचे वरदान मिळाल्याने उन्मत्त झालेल्या त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी भगवान शंकराने अर्धनारी नटेश्वर रुप धारण केले. भिमाशंकर परिसरात महादेवाने त्रिपुरासुराचा वध केला होता. अशा या देवस्थानाला भेट देण्यासाठी देशभरातून भाविक भिमाशंकरमध्ये दाखल होतात. प्रशासन व देवस्थानाकडून भाविकांसाठी योग्य त्या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, याठिकाणचा संपूर्ण परिसर हा अभयारण्याच्या हद्दीत येत असल्याने पाहिजे त्या सुविधा पुरवण्यात अडचणी निर्माण होतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.