ETV Bharat / state

दूध उत्पादक शेतकरी संकटात; लिटरमागे 5 रुपयांचा तोटा

author img

By

Published : May 4, 2021, 5:47 PM IST

करोना काळात राज्यातील दूध व्यवसायाला फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या राज्य शासनाच्या निर्बंधांमुळे मोठ्या प्रमाणात दूध खरेदी करणारी हॉटेल, चहाची दुकाने, खाणावळी बंद असल्याने रोजच्या दुधाच्या मागणीत जवळपास २० ते ३० टक्के घट झाली आहे.

Milk sale lockdown effect pune
दूध विक्री लॉकडाऊन फटका पुणे

खेड (पुणे) - करोना काळात राज्यातील दूध व्यवसायाला फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या राज्य शासनाच्या निर्बंधांमुळे मोठ्या प्रमाणात दूध खरेदी करणारी हॉटेल, चहाची दुकाने, खाणावळी बंद असल्याने रोजच्या दुधाच्या मागणीत जवळपास २० ते ३० टक्के घट झाली आहे.

माहिती देताना विष्णूशेठ हिंगे, पुणे जिल्हा दूध संघ

दैनंदिन दूध विक्रीला फटका

गेल्या वर्षी मार्चमध्ये करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारने देशव्यापी टाळेबंदी लागू केली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली. मात्र, हॉटेलांवर क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांनाच प्रवेश, असे काही निर्बंध लागू करण्यात आले. मार्चपासून पुन्हा करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने पुन्हा निर्बंधांमध्ये वाढ करण्यात आली.
त्यात हॉटेल बंद ठेवून केवळ पार्सल सुविधा सुरू करण्यात आली. या सगळ्यांचा फटका दैनंदिन दूध विक्रीवर झाला आहे. दुधाच्या संकलनाचे प्रमाण कायम आहे, दुधाचा अत्यावश्यक सेवेत समावेश असल्याने दुधाच्या वितरणावर काही परिणाम झालेला नाही. मात्र, विक्री घटली असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

'कात्रज'चे कालेकर म्हणाले, की राज्यात दुधाच्या विक्रीत घट झाली आहे. कात्रजचे रोजचे दुधाचे संकलन 2.56 लाख लीटर आहे. त्यापैकी सुमारे दीड लाख लीटर दूध शिल्लक राहते. शिल्लक राहिलेले दूध सध्या खासगी दूध कंपनीला द्यावे लागत आहे. हॉटेल, चहाची दुकाने,आइसक्रीम उत्पादक हे दूध खरेदी करणारे प्रमुख उद्योग करोनामुळे अनियमित पद्धतीने सुरू आहेत.

हेही वाचा - मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून 'मिशन वायू' उपक्रम; ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरचा पुरवठा

किरकोळ विक्रीची दुकाने केवळ ७ ते ११ या वेळेतच सुरू असल्याने दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विकणाऱ्या दुकानदारांकडून येणारी मागणी बंद झाली. शिवाय हॉटेल, कंपन्यांची उपाहारगृहे, रस्त्यांवरील चहाची दुकानेही बंद आहेत. त्यामुळे, एकूण २० ते ३० टक्के विक्री कमी झाली आहे. गेल्यावर्षी मार्चमध्ये करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर दूध विक्री विस्कळीत झाली होती. त्यानंतर नोव्हेंबर-फेब्रुवारी या दरम्यान दुधाची मागणी पूर्ववत झाली. मात्र, आता मार्चपासून पुन्हा दुधाच्या मागणीवर परिणाम झाला आहे. दुधाची विक्री जवळपास ३० टक्के कमी झाली असल्याने लिटर मागे पाच रुपयांनी दुधाचे कमी रेट शेतकऱ्यांना द्यावे लागत असून दूध संघाच्या वतीने सरकारला पत्र लिहून विनंती केलेली आहे, शिल्लक राहिलेले दूध सरकारने विकत घ्यावे अन्यथा शेतकऱ्याला लिटर माघे 5 रुपयांचे अनुदान द्यावे अन्यथा दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडेल.

हेही वाचा - रेमडेसिवीर न घेताही 91 वर्षीय आजोबांची कोरोनावर मात, टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.