ETV Bharat / state

संकष्टी चतुर्थीला दगडूशेठ गणपती मंदिर दर्शनासाठी बंद

पुण्यामध्ये मोठया प्रमाणात वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून आज संकष्टी चतुर्थीला मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने घेतला आहे. मंदिरात फक्त धार्मिक विधी करण्यात येणार आहेत.

author img

By

Published : Mar 31, 2021, 11:50 AM IST

दगडूशेठ हलवाई मंदिर भाविकांसाठी बंद
दगडूशेठ हलवाई मंदिर भाविकांसाठी बंद

पुणे - श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आज संकष्टी चतुर्थीला बंद ठेवण्यात आले आहे. पुण्यामध्ये मोठया प्रमाणात वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून आज संकष्टी चतुर्थीला मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने घेतला आहे. मंदिरात फक्त धार्मिक विधी करण्यात येणार आहेत. त्यामुळे गणेश भक्तांनी ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी केले आहे.

भाविकांनी घेतले बाहेरून दर्शन

दर महिन्याला संकष्टी चतुर्थीला शहर आणि उपनगरांतून हजारो भाविक मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात. त्यामुळे गर्दी होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून आज मंदिर बंद ठेवण्यात आले असून भाविकांना आज मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. संकष्टी चतुर्थीसह इतरही दिवशी भक्तांकरीता अभिषेक व्यवस्था आणि इतर पूजा ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा ट्रस्टने केली आहे. गणेश भक्तांसाठी घरबसल्या दर्शनाची सोय देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth_Android_App या लिंकवर २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. दरम्यान मंदिर बंद असले तरी सकाळ पासून भाविकांनी मंदिरासमोरील रस्त्यावरून बाप्पाचे दर्शन घेतले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.