ETV Bharat / state

Kasba By Electyion : भाजपला धक्का! दगडूशेठ उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांचा रवींद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा - Akshay Godse supports Ravindra Dhangekar

पुण्यात कसबा पोटनिडणुकीचा प्रचार हा शिगेला पोहचला आहे. भारतीय जनता पक्ष तसेच महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सुरू आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहे. अश्यातच पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा केल्याने भाजप उमेदवार हेमंत रासने यांना मोठा धक्का मानला जात आहे.

Ravindra Dhangekar
रवींद्र धंगेकर
author img

By

Published : Feb 23, 2023, 2:43 PM IST

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी माणिक चव्हाण हे असून दोन वर्षांनी ट्रस्टच्या अध्यक्षपदी तर सरचिटणीसपदी कसबा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने हे आहेत. तर उत्सव प्रमुख अक्षय गोडसे हे आहे. अश्यातच उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना पाठिंबा दिल्याने गणेश मंडळामध्ये चर्चेला सुरवात झाली आहे. अक्षय गोडसे हे दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे माजी अध्यक्ष कै.अशोक गोडसे यांचे पुत्र असून तात्या गोडसे हे अक्षय याचे आजोबा आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या उभारणीत गोडसे परिवारचे एक मोठे योगदान आहे. अक्षय गोडसे यांच्या या पाठिंब्याने गणेश मंडळाचे कार्यकर्त्यांमध्ये आत्ता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

1 हजार भगवत गीतांचे पुस्तकांचे वाटप : महाविकास आघडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचे आणि माझ्या परिवाराच गेल्या अनेक वर्षाचे नाते आहे. माझे आजोबा दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब गोडसे यांच्यापासून ते अशोक गोडसे आणि माझ्यापर्यंत त्यांचे अत्यंत स्नेहाच नाते आहे. तात्यासाहेब यांच्या प्रत्येक वाढदिवसाला धंगेकर हे तब्बल 1 हजार भगवत गीतांचे पुस्तके त्यांच्या प्रभागात वाटत होते. गेली अनेक वर्ष त्यांचे आणि आमचे स्नेहाच संबंध आहेत. आमच्या परिवाराचे त्यांना पाठबळ आहे. असे यावेळी अक्षय गोडसे म्हणाले.

प्रचारासाठी जोरदार तयारी : भाजपकडून आणि महाविकास आघाडीकडून पुण्यातील कसबा आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. भाजप आणि महाविकास आघाडीसाठी कसबा आणि चिंचवड निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष ताकदीनिशी प्रचार सभा, बाईक रॅली आणि पदयात्रेवर भर देत असल्याचे पहायला मिळत आहेत.

भिडे पुलापासून पदयात्रा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कसबा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यासाठी भिडे पुलापासून पदयात्रा काढणार आहेत. त्याशिवाय तेथे डेक्कनच्या नदीपात्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. रविंद्र धंगेकर कॉंग्रेसचे कसब्याचे उमेदवार यांच्यासाठी आदित्य ठाकरे हे रोड शो करणार आहेत. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची चिंचेची तालीम इथे एकत्रित सभा होणार आहे.आज प्रचारासाठी दोन्ही बाजूचे सर्वोच्च नेते मैदानात उतरणार आहेत.

हेही वाचा : Jet Airways : नरेश गोयल आणि पत्नी अनिता गोयल यांना दिलाला, तपास थांबवण्याचे उच्च न्यायालयाचे ईडीला आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.