ETV Bharat / state

अशोक चव्हाणांच्या 'त्या' विधानावर शिवसेना मंत्र्याची प्रतिक्रिया, म्हणाले... - Pune latest news

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड येथे बोलताना 'शिवसेनेकडून घटनाविरोधी काम करणार नसल्याचे लिहून घेतले आणि त्यानंतरच आम्ही एकत्र आलो', असे विधान केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा सरकारमध्ये बेबनाव असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यावर आता शिवसेनेचे राज्य कृषिमंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Dada Bhuse
दादा भुसे
author img

By

Published : Jan 28, 2020, 2:55 PM IST

पुणे - सामान्य नागरिकांपासून ते राष्ट्रपतीपर्यंत भारताचा प्रत्येक नागरिक घटनेवर चालतो. यात जगावेगळ असं काय आहे. घटनेच्या चौकटीत प्रत्येकाने वागणे अपेक्षित आहे. रस्त्याने चालताना डाव्या हाताने चालणे अपेक्षित असते. तेव्हा आपण मला कायदा माहीत नाही, असे म्हणू शकत नाही. त्यामुळे 3 वेगवेगळे पक्ष जेव्हा एकत्र येतात तेव्हा किमान समान कार्यक्रम ठरलेला असतो आणि अशोक चव्हाण म्हणतात, तसे काही लिहिले असेल, तर त्यावर तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्या सह्या असतील आणि हे तिन्ही पक्षांना लागू असेल, असे कृषिमंत्री दादा भुसे म्हणाले. ते आज मंगळवारी पुणे दौऱ्यावर आले आहेत. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

दादा भुसे, राज्य कृषिमंत्री

कृषिमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ते प्रथमच पुण्यात आले आहेत. शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाला भेट देऊन त्यांनी कामकाजाचा आढावा घेतला.

फेब्रुवारी अखेरीस पीक कर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात -

महाविकास आघाडीच्या सरकारने कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यानुसार संबंधित शेतकऱ्यांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस पीक कर्जाची रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे, असे भुसे यांनी सांगितले.

भाजपची अवस्था पाण्यावाचून तडफडणाऱ्या माशासारखी -

पाण्यातून बाहेर काढल्यानंतर जसा एखादा मासा तडफड करतो, तशी अवस्था सध्या भाजपची झाली आहे. त्यामुळे ते आमच्यावर टीका करतात. त्यांना आमच्यावर टीका करण्यात आनंद होत असेल, तर चांगली गोष्ट आहे. त्यांच्या टिकेकडे आम्ही सकारात्मकरित्या पाहतो.

Intro:अशोक चव्हाणांच्या 'त्या' विधानावर शिवसेना मंत्र्याची प्रतिक्रिया, म्हणाले.....

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड येथे बोलताना 'शिवसेनेकडून घटनाविरोधी काम करणार नसल्याचे लिहून घेतले आणि त्यानंतरच आम्ही एकत्र आलो' विधान केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा सरकारमध्ये बेबनाव असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यावर आता शिवसेनेचे राज्य कृषिमंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ' सामान्य नागरिकांपासून ते राष्ट्रपतीपर्यंत भारताचा प्रत्येक नागरिक घटनेवर चालतो. यात जगावेगळ असं काय आहे. घटनेच्या चौकटीत प्रत्येकाने वागणे अपेक्षित आहे. रस्त्याने चालताना डाव्या हाताने चालणे अपेक्षित असते. तेव्हा आपण मला कायदा माहीत नाही असं म्हणू शकत नाही. त्यामुळे तीन वेगवेगळे
पक्ष जेव्हा एकत्र येतात तेव्हा 'कॉमन मिनिमम प्रोग्रॅम' ठरलेला असतो. आणि अशोक चव्हाण म्हणतात तसं काही लिहिलं असेल तर त्यावर तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्या सह्या असतील. आणि हे तिन्ही पक्षांना लागू असेल.

कृषिमंत्री दादा भुसे आज पुणे शहराच्या दौऱ्यावर आहेत. कृषिमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ते प्रथमच पुण्यात आले आहेत. शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाला भेट देऊन त्यांनी कामकाजाचा आढावा घेतला.

Body:फेब्रुवारी अखेरीस पिककर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात

महाविकास आघाडीच्या सरकारने कर्जमाफीची घोषणा केली होती. त्या घोषणेमध्येच दोन लाखापर्यंतच थकीत पीककर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार संबंधित शेतकऱ्यांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस पीककर्जची रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.

Conclusion:भाजपची अवस्था पाण्यावाचून तडफडणाऱ्या माशासारखी

पाण्यातून बाहेर काढल्यानंतर जसा एखादा मासा तडफड करतो तशी अवस्था सध्या भाजपची झाली आहे. त्यामुळे ते आमच्यावर टीका करतात. त्यांना आमच्यावर टीका करण्यात आनंद होत असेल तर चांगली गोष्ट आहे. त्यांच्या टिकेकडे आम्ही सकारात्मकरित्या पाहतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.