पुणे - चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका फळबागांना बसला आहे. जुन्नरमधील ओतूर, खामूंडी, आळेफाटा परिसरातील डाळिंब व केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेली पीक भुईसपाट झाल्याने बागायतदार शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
चक्रीवादळामुळे काढणीला आलेली केळी व डाळींब गळुन पडल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मागील वर्षी अवकाळी पावसामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर वातावरणातील बदलामुळे केळी व डाळिंबावर रोगराई पसरली होती. यामुळे केळी व डाळिंबाचे गाळप 50 ट्क्यांनी घटले.
फळबागांसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बँकांचे कर्ज घेतल्याने शेतकरी आता मोठ्या संकटात सापडला आहे. दरम्यान या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.