ETV Bharat / state

आषाढी वारी : 'फिट रहा, औषधांना दूर ठेवा' संदेश देत प्रज्ञाची पुणे ते पंढरपूर सायकलवारी

पिंपरी-चिंचवड ते पंढरपूर असा सायकलवर प्रवास करून एका विद्यार्थिनीने आधुनिक वारी केली आहे.

आषाढी वारी : 'फिट रहा, औषधांना दूर ठेवा' संदेश देत प्रज्ञाची पुणे ते पंढरपूर सायकलवारी
author img

By

Published : Jul 3, 2019, 9:49 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवड ते पंढरपूर असा सायकलवर प्रवास करून एका विद्यार्थिनीने आधुनिक वारी केली आहे. तब्बल 240 किलोमीटरचा पल्ला तिने सायकलवर पार केला आहे. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रज्ञा संदीप सावंत, असे या मुलीचे नाव आहे. या वारीत तिने फिट रहा, आणि औषधांना दूर ठेवा, असा संदेश दिला आहे. ती इयत्ता दहावीत शिक्षण घेत आहे. तिला भविष्यात माऊंट एव्हरेस्ट सर करायचे आहे. तसेच तिने कुस्तीमध्ये भारतासाठी सुवर्ण पदक जिंकायचे, असे ध्येय ठरवले आहे.

आषाढी वारी : 'फिट रहा, औषधांना दूर ठेवा' संदेश देत प्रज्ञाची पुणे ते पंढरपूर सायकलवारी

प्रज्ञा निगडी येथील ज्ञान प्रबोधन नवनगर विद्यालयात शिक्षण घेत आहे. घरात वारीची परंपरा असून प्रज्ञाला ही विठुरायाच्या नामाची गोडी आहे. वारी तर करायची आहे पण ती आधुनिक पद्धतीने, अस प्रज्ञाने ठरवले होते. त्याप्रमाणे तिने तयारी सुरू केली. घरातून देखील आई वनिता यांनी तिला मोलाची साथ दिली. आधुनिक वारीला प्रज्ञाने पहाटे 4 च्या सुमारास सायकलवरून प्रवास सुरु केला. सोबत वडील आणि घरचे इतर 2 व्यक्ती होते. त्यामुळे तिला आणखीच पाठबळ मिळाले.

सकाळ पासून प्रवास संपेपर्यंत पाऊस सुरू होता. त्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेत प्रज्ञाने सायकलवर प्रवास केला. प्रज्ञाने १९ तास प्रवास करून एका दिवसात तिने पंढरीची वारी पूर्ण केली. विठुरायाकडे तिने सर्वांना निरोगी ठेव, असा आशीर्वाद मागितला.

Intro:mh pun fitness wari girl 20019 avb 10002Body:mh pun fitness wari girl 20019 avb 10002

Anchor:- पिंपरी-चिंचवड ते पंढरपूर असा सायकलवर प्रवास करून आधुनिक वारी एका विद्यार्थिनीने केलीय. तब्बल २४० किलोमीटर चा पल्ला तिने सायकलवर पार केलाय. त्यामुळे तीच सर्वत्र कौतुक होत आहे. प्रज्ञा संदीप सावंत अस विद्यार्थिनीचे नाव आहे. ती इयत्ता दहावीत शिक्षण घेत आहे. तिला भविष्यात माऊंट एव्हरेस्ट सर करायचं असून रेसलरमध्ये (कुस्ती) भारतासाठी सुवर्ण पदक जिंकायच अस तिने उद्दिष्ट ठेवलेले आहे. प्रज्ञा निगडी येथील ज्ञान प्रबोधन नवनगर विद्यालयात शिक्षण घेत आहे. घरात वारीची परंपरा असून प्रज्ञाला ही विठुरायाच्या नामाची गोडी आहे. वारी तर करायची आहे पण ती आधुनिक पद्धतीने अस तीन ठरवलं होतं त्याप्रमाणे तिने तयारी सुरू केली. बर तीला समाजात योग्य तो संदेश देखील द्यायचा होता म्हणून तिने सायकलवर प्रवास करून वारी करायचा निश्चय केला. घरातून देखील आई वनिता यांनी तिला मोलाची साथ दिली. Stayfit keep medicine away हा मूलमंत्र घेऊन आधुनिक वारीला पहाटे चार च्या सुमारास सायकलवरून प्रवास सुरु केला. सोबत वडील आणि दोन इतर घरचे व्यक्ती होते. त्यामुळे तिला आणखीनच पाठबळ मिळालं. सकाळ पासून प्रवास संपे पर्यंत पाऊस सुरू होता. त्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेत प्रज्ञाने सायकलवर प्रवास केला. लहानग्या पासून मोठ्या पर्यंत सर्वांकडे मोबाईल आहे. इंटरनेट च्या जगात सर्व मुलं मुली सोशीयल मीडियाचा आहारी गेले आहेत. त्यामुळं फिटनेस विसरत चालले आहेत त्यांना संदेश देण फार महत्वाच होत म्हणून प्रज्ञाने १९ तास प्रवास करून एका दिवसात तिने पंढरीची वारी पूर्ण केली. विठुरायाकडे सर्वाना निरोगी ठेव आणि फिट ठेव असा आशीर्वाद मागितला.

बाईट:- प्रज्ञा संदीप सावंत Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.