ETV Bharat / state

Water Cut In Pune: पुणे शहरात सध्या पाणीकपात नाही - चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

author img

By

Published : Apr 26, 2023, 8:44 PM IST

पुणे शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात केल्यास काही भागात पुढील दिवस पाणीपुरवठा विस्कळित होण्याबाबतच्या समस्येच्या अनुषंगाने तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी महानगरपालिकेने आठ दिवसात उपाययोजना सादर कराव्यात. तोपर्यंत शहरात पाणीकपात सुरू करण्यात येणार नाही, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले आहे.

Water Cut In Pune
शहरात सध्या पाणीकपात नाही

पुणे : यंदाच्या पावसाचा अंदाज पाहता धरणातील पाणी हे बचत करून ठेवणे गरजेचे आहे. धरण साखळीतील पाणीसाठा पाहता शहरात पाणीकपात सुरू करण्यात येणार नाही असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले. पण जर शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपातीचा निर्णय घेतला तर काही ठिकाणी पाणीपुरवठा विस्कळित होण्याबाबतच्या समस्येच्या अनुषंगाने तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने आठ दिवसात उपाययोजना सादर कराव्यात असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.

शासकीय विश्रामगृह येथे बैठक: जिल्ह्यातील प्रकल्पांची कालवे सल्लागार समिती बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे झाली, त्यावेळी ते बोलत होते. खडकवासला प्रकल्प कालवे सल्लागार समिती बैठकीस शहरातील आमदार, खासदार तसेच प्रशासकीय अधिकारी हे यावेळी उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, यंदा हवामान विभागाच अंदाज पाहता पाण्याची थोडी टंचाई येण्याची शक्यता आहे. आज धरण साखळीत जे पाणी आहे ते ऑगस्टपर्यंत कसे पुरवता येईल यादृष्टीनेही नियोजन करण्यात केले जात आहे. याबाबत शासनाकडून विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन हे देखील आत्ताच सुरू केले आहे.तर जवळच्या राज्यातून चारा आणण्याविषयी तयारी सुरू आहे.

पाणी ऑगस्टपर्यंत पुरवता येऊ शकते: पुणे शहरासाठी १५ जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दर आठवड्याला एक दिवस पाणीकपात केल्यास हेच पाणी ऑगस्टपर्यंत पुरवता येऊ शकते. तसेच एक दिवस पाणीकपात केल्यास, काही भागात त्या पाठोपाठचे काही दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होतो असे लोकप्रतिनिधींची तक्रार आहे. यावर महापालिकेने तातडीने उपाय योजना कराव्या आणि त्याचा अहवाल देखील सादर करावा. तसेच पुणे महानगरपालिकेसाठी १५ जुलैपर्यंत ४.५३ टीएमसी पाणी राखून ठेवण्यात आले आहे.असे देखील यावेळी पाटील म्हणाले.

धरणात इतका पाणीसाठा: खडकवासला प्रकल्पांतर्गत नवीन मुठा उजव्या कालव्याचे दुसरे आवर्तन हे १ मेपासून सोडण्यात येणार आहे. आज खडकवासला धरण साखळीत 25 एप्रिलपर्यंत 11.61 टीएमसी पाणीसाठा आहे. मुठा उजव्या कालव्याचे सिंचनासाठी 1 मे ते 15 जूनपर्यंत दुसरे उन्हाळी आवर्तन सोडण्याचे ठरवले आहे. बैठकीत कसबा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर हे देखील उपस्थित होते. त्यांनी देखील शहारत कोणत्याही प्रकारची पाणी कपात होऊ नये अशी मागणी केली आहे. तसेच महापालिकेने देखील शहरातील पाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने करावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

हेही वाचा: Mumbai Water Cut ऐन उन्हाळ्यात मुंबईसह ठाण्यात महिनाभर होणार 15 टक्के पाणीकपात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.