ETV Bharat / state

'कमिन्स' कंपनी तीन दिवस बंद, मनपा आयुक्तांचे कंपनीला आदेश - पुणे कोरोना परिस्थिती

पुणे येथील 'कमिन्स इंडिया लिमिटेड' या कंपनीच्या कामगारांमध्ये कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कंपनी तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी दिलेत.

कमिंन्स कंपनी
कमिंन्स कंपनी
author img

By

Published : May 20, 2021, 8:32 PM IST

पुणे - येथील 'डहाणूकर कॉलनी'त असलेल्या 'कमिन्स इंडिया लिमिटेड' कंपनीच्या कामगारांमध्ये, कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ३ दिवस कंपनी बंद ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

पुणे शहरात होत असलेल्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने उद्योगक्षेत्रासाठी नियमावली दिलेली आहे. महापालिका क्षेत्रात असलेल्या उद्योगक्षेत्रासाठीही महापालिकेने नियमावली दिलेली आहे. मात्र, कमिन्स कंपनीमध्ये या नियमावलीचे पालन होत नसल्याचे महापालिका आयुक्तांनी नमूद केले. तसेच, कंपनी क्षेत्रात कोरोना नियमांचे योग्य ते पालन होत नाही. याबाबत महापालिकेने कंपनीची पाहणी करून, अहवाल सादर केला आहे. या अहवालामध्ये येथील कामगारांमध्ये कोरोना संसर्ग वाढत असल्याची बाब महापालिकेच्या निदर्शनास आली. त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांत कंपनीतील २० टक्के म्हणजे २४० कामगारांना कोरोनाची लागण झाली. तर, ३ कामगारांचा मृत्यू झाला आहे. सध्या कंपनीतील ५० कामगार हे कोरोनाबाधित रुग्ण आहेत. कंपनीतील कोरोना रुग्णांची संख्या पाहता, हा भाग कोरोना 'हॉटस्पॉट' म्हणून महापालिकेकडून घोषित करण्यात आला आहे. कंपनी ३ दिवस बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व कामगारांची 'अँटिजेन' आणि 'आरटीपीसीआर' टेस्ट करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, ज्यांनी चाचणी केली त्यांना १० दिवसांनी पुन्हा चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कंपनीतील कँटीनमध्ये कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले आहेत.

हेही वाचा - आंतरराष्ट्रीय नेमबाज मोनाली गोऱ्हेंचं कोरोनामुळे निधन, सकाळीच वडिलांचाही मृत्यू

हेही वाच - आता घरबसल्या तुम्हीसुद्धा करू शकता कोरोना टेस्ट; पुण्यातील कंपनीने तयार केले किट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.