पुणे - राजगुरूनगर शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत मागील काही दिवसांपासून ग्राहकांची गर्दी कमी होत नाही. पीक कर्जाचा हप्ता घेण्यासाठी बँकेत ग्राहकांची गर्दी वाढत चालली आहे. दिवसेंदिवस शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असताना बँकेतील कर्मचारी व ग्राहकांना त्याचा विसर पडलेला दिसून येत आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत पीक कर्जाचा हप्ता घेण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने आज (दि. 10 मे) आल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र, यावेळी बँकेत येणाऱ्या शेतकरी किंवा ग्राहकाला कोरोनाचा जणू काही विसरच पडलेला दिसत होता. तर मोठ्या संख्येने शेतकरी येऊ शकतात याचा अंदाज असतानाही बँक व्यवस्थापणाकडून कोणत्याही प्रकारच्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात आले नसल्याचेही दिसत होते.
हेही वाचा - कोरोना रुग्ण कमी न होणाऱ्या गावांचा 'हाय अलर्ट' गावांमध्ये समावेश