पुणे - जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जनतेने रविवारच्या जनता कर्फ्युला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्यानंतर आज पुणे-नाशिक, पुणे-नगर महामार्गावर गर्दी केली आहे. तर राजगुरुनगर शहरात मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर पाहायला मिळत आहे.
पोलीस व प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी रिक्षातून दवंडी दिली जात आहे. त्याच ठिकाणी नागरिक गर्दी करुन फिरताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून घेण्यात आले नियम नागरिकच पायदळी तुडवत आहे. त्यामुळे पुढील काळात प्रशासनाकडून ठोस भुमिका घेण्याची गरज आहे.
नागरिक स्वतःची काळजी घेताना दिसत नाहीत. नागरिक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडत असून सुरक्षेची कुठली खबरदारी न घेता तोंडाला मास्क रूमाल काहीही न बांधता खुलेआम फिरताना आहेत. तर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकही सुरु आहे.
हेही वाचा - पुण्यात शाळा बंद! विद्यार्थ्यांचे शिक्षण मात्र ऑनलाईन सुरू, ज्ञान प्रबोधिनीचा उपक्रम