ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये मटण, चिकन दुकानांवर नागरिकांची गर्दी;कोरोना संसर्ग वाढण्याची भीती

नागरिकांनी गटारीचे औचित्य साधून चिकन आणि मटण दुकानांसमोर खरेदीसाठी रांगा लावल्या. यामुळे फिझिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात आज गटारीच निमित्त साधून मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडले आहेत.

Meat shops in pcmc
पिंपरी चिंचवडमध्ये मटण दुकानाबाहेर गर्दी
author img

By

Published : Jul 19, 2020, 2:40 PM IST

Meat
पिंपरी-चिंचवडमध्ये मटण, चिकन दुकानांवर नागरिकांची गर्दी

पुणे- पिंपरी-चिंचवडमध्ये नागरिकांनी गटारीचे औचित्य साधून चिकन आणि मटण दुकानांसमोर खरेदीसाठी रांगा लावल्या. यामुळे फिझिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. शहरात दहा दिवसांचे लॉकडाऊन लागू करण्यात आहे. पहिल्या पाच दिवसांचे लॉकडाऊन संपल्याने नियम शिथील करण्यात आले आहेत.

आजपासून शहरातील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने आणि चिकन आणि मटणची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

केवळ आज सकाळी 8 ते सायंकाळी 6 पर्यंत दुकाने सुरु असणार असून उद्यापासून सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत दुकाने खुली ठेवण्यास मुभा आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज गटारीच निमित्त साधून मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडले आहेत. आजच्या दिवशी नियमात बदल करत खास नॉनव्हेजवर ताव मारणाऱ्या नागरिकांना चिकन आणि मटण खरेदी करता यावे यासाठी वेळेत प्रशासनाने बदल केला आहे.

सकाळी आठ वाजल्यापासून शहरातील मांस विक्रेत्यांच्या दुकानांसमोर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. शिवाय अनेक जणांनी दीड ते दोन तास रांगेत उभे राहून मटण खरेदी केले आहे.

दरम्यान, नागरिकांनी आजच्या दिवशी लॉकडाऊनमध्ये दिलेली सूट बघता महानगर पालिकेचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.