ETV Bharat / state

Pune Crime : बाईक चोरणाऱ्याला अटक, 8 गाड्या केल्या जप्त - वाहनांची चोरी

वाहनांची चोरी करण्यात पटाईत असलेला आरोपी आसिफ अकबर शेख पोलिसांच्या हाती लागला. त्याची चौकशी करताच एक, दोन नाही तर चक्क 8 बाईक त्याच्या ताब्यातून जप्त करण्यात आल्या आहेत.

Criminal Thief Arrested
नशेत चोरायचा गाड्या
author img

By

Published : May 8, 2023, 9:20 PM IST

माहिती देताना पोलीस उपआयुक्त

पुणे : शहर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांची चोरी होत होती. पुणे शहरात घडत असलेल्या गुन्ह्यांच्या बाबतीत जर माहिती घेतली तर वेगवेगळ्या शकली लावून चोरी करतानाचे अनेक प्रकरणे आपण पाहिले आहे. अशीच काहीशी घटना पुण्यातील लष्कर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. हा चोर दारूच्या नशेत गाड्या चोरायचा आणि दारू उतरली की, तो तिथेच गाडी सोडून द्यायचा. अश्या या चोराला लष्कर पोलिसांनी अटक केली आहे.

08 गुन्हे उघडकीस आणले: या प्रकरणी पोलिसांनी आसिफ अकबर शेख वय ३० वर्षे धंदा व्यवसाय रा. गल्ली नं २१ स्काय रेसिडन्सी ०१ ला मजला, प्लॅट नं. १०१, भाग्योदय नगर, कोंढवा याला अटक केली आहे. त्याचाकडुन चोरीस गेलेले 08 मोटार सायकली 3,60,000 चे जप्त करुन लष्कर पोलीस स्टेशनचे 06 व इतर पोलीस स्टेशनचे 02 गुन्हे असे एकूण 08 गुन्हे उघडकीस आणले आहे.

गुन्हयाची थोडक्यात हकिगत: लष्कर पोलीस स्टेशन येथे शसुरज बोराटे, वय २३ वर्षे, धंदा शिक्षण. रा विलास यादव यस्ती गांव काटी, ता. इंदापुर, जि. या फिर्यादीने फिर्याद दिली की, त्यांची हिरो होंडा पेंशन कंपनीची मोटार सायकल क्रमांक MH14Y9248, चासीज नंबर 01J21C344, इंजिन नं. 01J21M17693 सन २००२ चे मॉडेल असलेली गाडी, 28 आणि 29 जानेवारीच्या सुमारास फिर्यादी यांनी तुलसीदास अपमेंटच्या बाहेर रोडवर, कॅम्प, पुणे येथे हॅन्डल लॉक व पार्क केली असता अज्ञात चोरटयाने चोरुन नेली म्हणुन अज्ञात इसमाविरोधात तक्रार दिली होती.

सीसीटीव्ही फुटेज तपासले: याबाबतीत पोलिसांनी माहिती दिली की, दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत पोलीस तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेज मधील व रेकॉर्डवरील गुन्हेगार कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत रवाना झाल्याचा दिसले. याबाबत आधिक तपास करून सापळा रचून आरोपीच्या राहत्या घरी जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.

दारुच्या नशेत केली चोरी: दाखल गुन्हयातील अटक आरोपी हा दारुच्या नशेत मोटार सायकल वाहने चोरी करुन ती पेट्रोल संपेपर्यंत वापरत असे पेट्रोल संपल्यानंतर तो ते वाहन तेथेच सोडुन देत होता व तेथुन दुसरी मोटार सायकल चोरुन नेत होता. असे त्यांनी यापुर्वी मार्केटयार्ड पोलीस स्टेशन खडक पो स्टें, भारती विदयापीठ पोलीस, लष्कर पोस्टे येथे वाहन चोरीचे गुन्हयात अटक करण्यात आली आहे. तर दाखल गुन्हयातील आरोपी यास लष्कर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ९९/२०२३ भादवि कलम ३७९ मध्ये आज अटक करण्यात आली आहे. त्याचेकडुन त्यानी अशा प्रकारे कोठे कोठे चो-या केल्या आहेत का, त्याबाबत सखोल तपास करून गुन्हे उघडकीस आणले आहे.

हेही वाचा:

Thief Bullets टिटवाळा रेल्वेच्या पार्किंगमधून बुलेट लंपास करणारा चोरटा सीसीटीव्हीत कैद

Pune Crime News परराज्यातील महिलांचे सुरू होते पुण्यात सेक्स रॅकेट असा झाला पर्दाफाश

Holiday Package Fraud हॉलिडे पॅकेजच्या नावाखाली हुश्शार पुणेकरांना कोट्यवधी रुपयांचा चुना कंपनीकडून नो रिस्पॉन्स

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.