पुणे - मल्टी-स्टेट बी.एच.आर. (भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था) संचालकाच्या जळगावासह औरंगाबादमधील घरी पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकांनी छापे टाकून चौकशी सुरू केली आहे. रात्री उशिरापर्यंत चौकशीचे कामकाज सुरू होते. बी. एच. आर. पतसंस्था घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने कारवाईच्या निमत्ताने कंबर कसली आहे.
ठेवी माघारी न मिळाल्याने छापेमारी-
ठेवीदारांच्या ठेवी माघारी न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांच्या तीन पथकाकडून जळगाव आणि औरंगाबादमध्ये छापेमारी केली आहे. याप्रकरणी पुणे, पिंपरी आणि ग्रामीणला प्रत्येकी एक मिळून तीन गुन्हे दाखल आहेत. बी. एच. आर. पथसंस्थेचे जितेंद्र कंडारे यांच्या जळगावातील शिवाजीनगरमधील घरी सकाळीच आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकल्याने खळबळ उडाली होती. पतसंस्थेच्या कार्यालयास इतर शहरातील काही ठिकाणी आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशी सुरू केली आहे.
आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी सांगितले की, बीएचआर पंतसंस्थेतील घोटाळ्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी जळगाव आणि औरंगाबादमध्ये आर्थिक गुन्हे शाखेने छापे टाकले आहेत.
अपहार आणि फसवणुकीच्या तक्रारी -
जळगाव शहरातील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी-स्टेट कॉ ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी (बीएचआर) ही अपहार व फसवणुकीच्या घटनेनंतर अवसायकाच्या गैरव्यवहाराने चर्चेत आली आहे. पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने विविध मालमत्तांवर छापे टाकले आहेत. यामध्ये अवसायक जितेंद्र कंडारे, कर्जदार, ठेवीदार संघटनांचे पदाधिकारी व पतसंस्थेच्या जागा लिलावात भाग घेणाऱ्या उद्योजकांच्या मालमत्तांचा समावेश आहे. शहरातील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी-स्टेट कॉ ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीतील (बीएचआर) अपहार तसेच फसवणूक प्रकरणी राज्यभरात पतसंस्थेच्या चेअरमनसह इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर या पतसंस्थेवर पाच वर्षांपासून अवसायकाची नेमणूक करण्यात आली आहे. अवसायकांच्या काळात गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. या तक्रारीवरून (शुक्रवारी) पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सकाळपासूनच अवसायकाचे निवासस्थान, संस्थेच्या मुख्य कार्यालयासह पाच ठिकाणी शंभरपेक्षा अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली आहे
हेही वाचा -लँडिंग होण्याआधी विमानातील कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका
हेही वाचा -पुण्यातील व्यावसायिक अविनाश भोसले यांची ईडी चौकशी