ETV Bharat / state

Cricket World Cup 2023 : यंदाच्या विश्वषकाच्या अंतिम सामन्यात दिसू शकतात 'हे' दोन संघ; बीसीसीआयचे माजी निवडकर्ते सुरेंद्र भावे यांचे भाकित - साऊथ आफ्रिका

Cricket World Cup 2023 : यजमान भारताला आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी न्यूझीलंडविरुद्धचा सामना महत्त्वपूर्ण असणा आहे. असं मत बीसीसीआयचे माजी निवडकर्ते सुरेंद्र भावे यांनी ईटीव्ही भारतला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलं.

Cricket World Cup 2023
Cricket World Cup 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 22, 2023, 10:05 AM IST

बीसीसीआयचे माजी निवडकर्ते सुरेंद्र भावे

पुणे Cricket World Cup 2023 : यंदाच्या विश्वचषकात भारताची विजयी मोहीम सुरूच आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं आतापर्यंत 4 सामने खेळले असून सर्व सामने जिंकले आहेत. यानंतर आज धर्मशालामध्ये भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. या सामन्यासाठी भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या हा अनफिट असल्यानं तो खेळणार नाही. त्याच्या जागी भारतीय संघानं खेळपट्टी पाहून मोहम्मद शामी किंवा सूर्यकुमार यादव तसंच आश्विन याची निवड करावी, असं मत 2011 साली विश्वचषकमध्ये भारतीय संघ निवडणारे बीसीसीआयचे माजी निवडकर्ते सुरेंद्र भावे यांनी दिलीय. तसंच सध्या भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ चांगल खेळत आहे. मी या दोन्ही संघांना फायनलमध्ये बघत असल्याचं भावे यांनी सांगितलं.

भारतीय संघाची कामगिरी उत्तम : विश्वचषकात न्यूझीलंड संघानं 4 सामने जिंकले आहेत. गुणतालिकेमध्ये न्यूझीलंड पहिल्या क्रमांकावर आहे, तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. एकूणच आतापर्यंत भारतीय संघाची कामगिरी बाबत भावे यांना विचारलं असता ते म्हणाले की, भारतीय संघ हा खूप छान कामगिरी करत आहे. रोहित शर्माच्या कर्णधार पदाच्या कामगिरीत मला अतिशय कल्पकता दिसत आहे. सध्याचे सामने पाहिले असता भारतीय संघाची गोलंदाजी खूप चांगली होत आहे. गोलंदाज हे आपल्या फलंदाजांचं काम खूपच सोपे करत आहेत. तसंच जे खेळाडू विश्वचषक सुरू होण्याच्या आधी अनफिट होते ते आता फिट झाले आहेत. आताच्या संघाचे क्षेत्ररक्षण मागील 10 वर्षातील सर्वोत्तम आहे. संघ अप्रतिम क्षेत्ररक्षण करत असून संघासाठी 20 ते 25 धावा वाचविताना दिसत आहेत. सर्वच क्षेत्रामध्ये आतापर्यंत भारतीय संघाची कामगिरीही सुरेख सुरू आहे. तसंच या संघाकडून आपल्याला खूपच अपेक्षा असल्याचं यावेळी भावे यांनी सांगितलंय.

भारताचे पुढील तिन्ही सामने हे महत्त्वाचे आहेत. भारताचे न्यूझीलंड, साऊथ आफ्रिका आणि इंग्लंड या संघाबरोबर सामने होणार आहेत. हे तिन्ही संघ खूपच चांगले खेळत असल्यानं हे सामने खूपच महत्त्वाचं आहेत. तसंच सामना हा अंतिम सामन्यात प्रवेश मिळविण्याच्या दृष्टीनें खूपच महत्त्वाचा सामना आहे-माजी निवडकर्ते सुरेंद्र भावे

हार्दिक पांड्याला कोणता पर्याय? : पुण्यातील गहुंजे इथं भारताचा बांगलादेश विरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या जखमी झाल्यानं तो आजच्या सामन्यात खेळताना दिसणार नाही. याबाबत भावे यांना विचारलं असता ते म्हणाले की, संघाचे सर्वजण हे हार्दिक पंड्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहेत. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात तो परत येणार असल्याचं सांगण्यात येत आहे, असंही भावे म्हणाले. संघ व्यवस्थापनाला जर टीम संतुलित करायची असेल तर त्यांच्याकडे आश्विन आणि सूर्यकुमार हे दोन चांगले पर्याय आहेत. तसंच ईशान किशननंदेखील एका सामन्यात 50 धावा केल्या आहेत. तर त्याला देखील आजच्या सामन्यात संधी दिली जाऊ शकते. गोलंदाजीला पोषक खेळपट्टी असेल तर आश्विनला आणलं जाईल. मात्र जर फलंदाजीला पोषक खेळपट्टी आसेल तर सूर्या किंवा ईशानपैकी एक खेळाडू आपल्याला टीम मध्ये पाहायला मिळेल. तसेच धर्मशाळेच जर आपण मैदान बघितलं तर त्या मैदानावर चांगला बाऊन्स पाहायला मिळतो. ते पाहता मोहम्मद शमीला देखील संघात स्थान दिलं जाऊ शकते, अशी माहितीदेखील यावेळी भावे यांनी दिली

हेही वाचा :

  1. World Cup 2023 IND vs NZ : जखमी हार्दिक पंड्याची जागा कोण घेणार, राहुल द्रविडनं स्पष्टचं सांगितलं
  2. India vs New Zealand : भारत-न्यूझीलंड विश्वचषक सामन्यांत कोण करणार जादू? जाणून घ्या दोन्ही संघाचा आढावा
  3. World Cup 2023 IND vs NZ : भारत, न्यूझीलंडमध्ये होणार काटे की टक्कर; काय आहे भारतीय संघाची रणनीती? वाचा सविस्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.