ETV Bharat / state

Cricket World Cup 2023 : तब्बल 27 वर्षानंतर पुण्यात 'क्रिकेट विश्वचषक'चे सामने; कशी आहे तयारी? जाणून घ्या रोहित पवारांकडून

World Cup 2023 : आजपासून (5 ऑक्टोबर) भारतात 'क्रिकेट विश्वचषक' स्पर्धेला सुरुवात झाली आहे. यात विशेष बाब म्हणजे तब्बल 27 वर्षानंतर पुण्यात क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे सामने होणार आहेत. विश्वचषक स्पर्धेतील पाच सामन्यांचं यजमानपद महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमला मिळालंय. यासंदर्भात 'एमसीए'चे अध्यक्ष रोहित पवार यांच्यासोबत 'ईटीव्ही भारत'नं खास संवाद साधलाय.

Cricket World Cup 2023
Cricket World Cup 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 5, 2023, 3:31 PM IST

Updated : Oct 5, 2023, 3:51 PM IST

रोहित पवार यांची प्रतिक्रिया

पुणे World Cup 2023 : भारतीय क्रिकेट संघाचा 19 ऑक्टोबरचा बांगलादेश विरुद्धचा सामना हा पुण्यातील 'एमसीए' स्टेडियमवर खेळला जाणार आहे. 'एमसीए'वर होणाऱ्या सर्व सामन्यांसाठी आम्ही तयार आहोत. सर्व सोयी-सुविधा स्टेडियमवर करण्यात आल्याची माहिती रोहित पवार यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली. प्रेक्षकांसाठी खास सुविधा : पुण्यातील एमसीए स्टेडियवर पाच सामने होणार आहेत. त्यासंदर्भात तयारी पूर्ण झाली आहे. हे सर्व 50 ओव्हरचे सामने असणार आहेत. उन्हात देखील हे सामने होणार असल्यानं बसण्याची व्यवस्था तसंच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता गृह आणि पार्किंगची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. सामना पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पूर्ण तयारी 'अपेक्स बॉडी'कडून करण्यात आली आहे. ज्या ज्या गोष्टी करायला पाहिजे, त्या सर्व गोष्टी आम्ही केल्या असल्याचे यावेळी रोहित पवार यांनी सांगितलं.

महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट : इतर राज्यांपेक्षा जास्त सामने हे महाराष्ट्रात होणार आहेत. एकूण 10 सामने हे महाराष्ट्रात होणार आहेत. त्यापैकी 5 सामने हे पुण्यात होत आहेत, ही आपल्यासाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे. आयसीसीबरोबर पाठपुरावा हा खूपच चांगला झाला आणि त्यांनी मान ठेवत आम्हाला विश्वचषकचे पाच सामने दिले आहेत, असे यावेळी रोहित पवार म्हणाले.

युवा खेळाडूंसाठी प्रोत्साहन : गेल्या आठ महिन्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे युवा पुरुष, महिला खेळाडूंना खेळण्याची संधी जास्तीत जास्त उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसंच या युवा खेळाडूंचे सामने देखील वाढवण्यात आले आहेत. आता ही सुरुवात असून, येत्या काळात 'यपीएल'मध्ये देखील आपल्याला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू खेळताना पाहायला मिळणार आहेत. नक्कीच आपल्याला भारतीय संघात देखील 'एमसीए'चे खेळाडू हे खेळताना पाहायला मिळतील, असा विश्वास आम्हाला असल्याचं यावेळी रोहित पवार यांनी सांगितलं.

आवडता खेळाडू कोण? : भारतीय संघात आवडता खेळाडू कोणता याबाबत रोहित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, विराट कोहली हा माझा आवडता खेळाडू आहे. तसेच धोनी देखील माझा आवडता प्लेयर असून, यंदा मात्र तो विश्वचषकमध्ये खेळत नाहीये. महत्त्वाचं म्हणजे एका प्लेयरवर संघाची कामगिरी अवलंबून नसते, तर सर्व प्लेयर हे चांगले असले पाहिजेत आणि तेव्हाच संघ जिंकू शकतो. भारतीय संघाने यंदाचा विश्वकप जिंकावा अशी माझी इच्छा आहे. पण खेळात समोरच्या व्यक्तीला कमी समजून कधीही चालत नाही, असंही यावेळी रोहित पवार म्हणाले.

उपांत्य फेरीमध्ये कोण येणार? : विश्वचषकमधील उपांत्य फेरीमध्ये कोणकोणते संघ येणार आहेत? याबाबत रोहित पवार म्हणाले की, कोणते संघ येतील याबाबत मी आताच सांगू शकत नाहीं. पण भारतीय संघ असावा, असं आम्हाला वाटतं. तसेच इंग्लंड, श्रीलंका आणि अफगाणिस्तान हे संघ देखील चांगले आहेत.

हेही वाचा -

  1. Cricket World Cup 2023 ENG vs NZ : वर्ल्डकपचा थरार सुरू, गत विश्वविजेते करणार प्रथम फलंदाजी; न्यूझीलंड-इंग्लंडमध्ये रंगणार सामना
  2. Sachin Tendulkar: 50 छोट्या क्रिकेटपटूंना क्रिकेट किटचे वाटप; जेव्हा सचिन गुगली शिकवतो...
  3. Cricket World Cup 2023 : नरेंद्र मोदी स्टेडियम बनण्यापूर्वी मोटेराची काय होती स्थिती? जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी

Last Updated : Oct 5, 2023, 3:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.