पुणे - अलंकापुरीमध्ये आषाढी वारी सोहळ्याची लगबग सुरू असताना, मंदिर परिसरात राहणाऱ्या एका कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू झाला. यामुळे प्रशासनाने हा परिसर कंटेनमेंट झोन जाहीर करून सील केला आहे. या कारणाने मंदिर परिसरात शांतता पाहायला मिळत आहे.
आळंदी परिसरात दोन दिवसापूर्वी कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू झाला. यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून मंदिर परिसर कंटेनमेंट जाहीर करत सील केला आहे. त्यात आणखी एक कोरोना रुग्ण या परिसरात सापडला. या कारणाने या परिसरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. अशात आषाढी वारीचा सोहळा होणार आहे. पण यात मोजक्याच वारकऱ्यांना सहभागी होण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान, या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आषाढी वारी सोहळ्याला दरवर्षी मंदिर परिसरामध्ये भक्तीची मांदियाळी सुरू असते. टाळ-मृदुंगाचा आवाज माऊलीच्या नावाचा जयघोष करत मोठ्या भक्तिभावाने हा सोहळा होत असतो. पण यंदाच्या वर्षी कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा होत आहे. यामुळे वारकऱ्यांमधून नाराजी आहे.
हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये शुक्रवारी ९८ कोरोना रुग्णांची नोंद; आतापर्यंत ६२६ रुग्णांना डिस्चार्ज..
हेही वाचा - नियमांची पायमल्ली करत विद्यार्थ्यांची घेतली परीक्षा; 14 जणांवर गुन्हा दाखल..