पुणे - विभागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1085 झाली असून विभागात 181 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अॅक्टीव रुग्ण 831 आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 73 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 38 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे जिल्हयात 985 बाधित रुग्ण असून 67 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 21 बाधित रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 41 बाधित रुग्ण असून 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 28 बाधित रुग्ण असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात 10 बाधित रुग्ण आहेत. आजपर्यंत विभागामध्ये एकूण 12 हजार 755 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 12 हजार 86 चा अहवाल प्राप्त आहे. 669 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.
प्राप्त अहवालांपैकी 10 हजार 939 नमुन्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 1 हजार 85 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे. आजपर्यंत विभागामधील 49 लाख 58 हजार 977 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्या अंतर्गत 1 कोटी 91 लाख 16 हजार 464 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 989 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.