ETV Bharat / state

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक सुरू..

पुण्यातील विधानभवन सभागृहात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक सुरू झाली आहे.

pune
विधानभवन पुणे
author img

By

Published : Jul 30, 2020, 12:58 PM IST

Updated : Jul 30, 2020, 3:54 PM IST

पुणे - पुण्यात कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री ठाकरे स्वतः गाडी चालवत विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचले. ते पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. सोबतच पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाबाबत घेतल्या जाणाऱ्या उपाय योजनांचाही आढावा घेणार आहेत. पुण्यात कोरोनाचा कहर सुरू असताना मुख्यमंत्री पुण्याकडे दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप भाजपकडून केला जात आहे. त्याला मुख्यमंत्री काय उत्तर देणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीही उपस्थितीत असणार आहेत. त्यासोबत पुण्याचे विभागीय आयुक्त, पुण्याचे जिल्हाधिकारी, आरोग्य अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला साडेबारा वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात सुरुवात होणार आहे. बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दुपारी अडीच वाजता कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत प्रशासकीय यंत्रणेसमवेतही एक बैठक होणार आहे.

  • अपडेट

बैठकीला सुरुवात...

पुण्यातील विधानभवन सभागृहात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक सुरू झाली आहे.
बैठकीला कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ व पिंपरी-चिंचवडच्‍या महापौर उषा ऊर्फ माई ढोरे व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित आहेत.

जंबो हॉस्पिटल्सची टाईमलाईन सरकारने सांगावी....

पुण्यात तीन जंबो हॉस्पिटल्स कधी सुरू होतील याची टाईमलाईन सरकारने सांगावी. ही तीन जंबो हॉस्पिटल्स सुरु होईपर्यंत उद्यापासून पुण्यात कोणती सुविधा लोकांना उपलब्ध असेल हे सरकारने सांगावे. पुण्यात तीन जंबो हॉस्पिटल्स सुरु करण्यासाठी महापालिकेने त्यांचा वाटा उचलावा पण राज्य सरकारने महापालिकेला मदत करावी. असे बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Last Updated : Jul 30, 2020, 3:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.