ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा चढता आलेख; दिवसभरात आढळले ४९ रुग्ण - corona positive cases in Pimpri Chinchwad

पिंपरी-चिंचवड शहरात दुपारी साडेचार वाजेपर्यंत तब्बल ४९ जण कोरोनाबाधित रुग्ण आढळले असल्याचा अहवाल महानगरपालिकेकडून आला आहे, तर दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सांगितले.

पिंपरी-चिंचवड न्यूज
पिंपरी-चिंचवड न्यूज
author img

By

Published : May 29, 2020, 8:25 PM IST

पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात ४९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून यात ११ जण शहराबाहेरील रुग्ण आहेत. आज दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. शहरातील बाधित रुग्णांची संख्या आता ४९७ वर पोहोचली असून १४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात आतापर्यंत एकूण २११ जण, तर शहराबाहेरील २५ जण कोरोनातून बरे झाले आहेत. शहराच्या हद्दीबाहेरील एकूण १२ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा चढता आलेख; दिवसभरात आढळले ४९ रुग्ण
पिंपरी-चिंचवड शहरात दुपारी साडेचार वाजेपर्यंत तब्बल ४९ जण कोरोनाबाधित रुग्ण आढळले असल्याचा अहवाल महानगरपालिकेकडून आला आहे. तर दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सांगितले. यात जुन्नर येथील ३८ वर्षीय पुरुष तर शहरातील सांगवी परिसरातील ७५ वर्षीय वृद्ध नागरिकाचा समावेश आहे. दरम्यान, दररोज वाढत असलेल्या कोरोनाबाधित संख्येमुळे नागरिक चिंतेत आहेत. आज बाधित आढळलेले रुग्ण हे आनंदनगर, वाल्हेकरवाडी, रुपीनगर, बौध्दनगर, महात्माफुले नगर, भीमनगर, च-होली, सांगवी, नेहरूनगर, दापोडी, वाकड, जुन्नर, कसबापेठ, राजगुरुनगर, देहुरोड, औंध, खडकी, सोलापूर, आंबेगाव येथील रहिवासी असून त्यांच्यावर महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज चिखली, आनंदनगर, शिवाजीनगर, बीड येथील रहिवासी असलेल्या १४ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. शहरातील सिध्दार्थ बिल्डिंग, अजंठानगर येथील ( अमृतकृपा हौसिंग सोसायटी - ट्रान्सपोर्ट कॉर्पे ऑफ इंडिया - विनोद व्हरायटी - अमृतकृपा हौसिंग सोसायटी ), कुलदिप आंगण, नेहरूनगर येथील ( तरटे किराणा दुकान - लक्ष्मी टेफ्लॉक्स - कुलदीप आंगण सोसायटी - अमिर चिकन सेंटर - तरटे किराणा दुकान ) आणि सोनकर चेंबर्स, पिंपरी ( गरीब नबाब हॉटेल - गर्ग प्रोव्हिजन स्टोअर्स - नानल हॉस्पिटल – गरीब नबाब हॉटेल ) परिसर आज मध्यरात्री पासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.