पुणे - कोरोना महामारीमुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत, तर काही जणांचा व्यवसाय अत्यंत मंद गतीने वाटचाल करत असल्याचे पाहायला मिळत आहे. राख्या विक्री करणाऱ्या व्यवसायिकांना कोरोनाचा जबर फटका बसला असून, 70 टक्के व्यवसाय ठप्प असल्याने राखी विक्रेते असमाधानी आहेत. 3 दिवसांवर येऊन ठेपलेला रक्षाबंधन सण दरवर्षीप्रमाणे साजरा होणार नसल्याचे दिसत असले तरी बहीण आपल्या भावाला विविध माध्यमातून राखी बांधणार हे नक्की आहे. जग डिजिटल झालं असल्याने ऑनलाइन माध्यमातून रक्षाबंधन साजरा करणार असल्याचे महिला सांगतात.
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाने थैमान घातले असून, कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजारवर पोहोचला आहे. अशातच, राखी व्यावसायिकांना आर्थिक मंदीचा सामना करावा लागत आहे. चिंचवड शहरातील महावीर राखी प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे अंध बांधव आपल्या हाताने हस्तकलेच्या माध्यमातून येथील राख्या बनवतात. यातून त्यांना रोजगार उपलब्ध होतो. या राख्यांना इतर राज्यातून मोठ्या प्रमाणावर मागणी असते. मात्र, कोरोना महामारीमुळे यावर्षी ते शक्य झालं नाही. त्याचा मोठा आर्थिक फटका महावीर राखी व्यवस्थापनाला बसला आहे. दरवर्षी, राखी घेण्यासाठी नागरिकांची गर्दी असायची. परंतु, यावर्षी कोरोना महामारिच्या पार्श्वभूमीवर महिलांचा प्रतिसाद कमी पाहण्यास मिळत आहे. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी 70 टक्के व्यवसाय ठप्प असल्याचे दुकान मालक पराग कुंकुलोळ सांगतात. यावर्षी केवळ 30-35 टक्के व्यवसाय झाला असून, पूर्णतःतोट्यात व्यवसाय गेला असल्याचं ते म्हणाले.
दुकान मालक म्हणाले की, कोरोना महामारीचा रक्षाबंधन सणावर परिणाम जाणवत नसला तरी व्यावसायिकांना फटका बसला आहे. वर्षभर हस्तकलेच्या माध्यमातून विविध राख्या निर्मितीचे काम सुरू असते. यातून अंध बांधव, आणि इतर कामगारांना रोजगार मिळतो. मार्च महिन्यात लॉकडाऊन झाल्यापासून राख्या निर्मितीचे काम थांबवावे लागले. याचा खूप मोठा फटका राखी व्यवसायिकांना बसला आहे. यावर्षी तब्बल 70 टक्के व्यवसाय ठप्प झाला आहे.
कोरोना महामारीमुळे बाहेरगावी असलेल्या भावासोबत रक्षाबंधन साजरा करणे शक्य नाही. पण बहीण भावाला राखी बांधनारच. यावर्षी झूमद्वारे राखीचा सण साजरा करणार आहोत. गावी जाणे किंवा भाऊ शहराकडे येणे शक्य नाही. त्यामुळे ऑनलाइन पर्याय निवडला असल्याचे ग्राहक प्रियंका पहाडे या सांगतात. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी गर्दी कमी आहे. नागरिकांच्या मनात कोरोनाची भीती आहे. ग्राहकांची सुरक्षाही प्रथम बाब आमच्यासाठी महत्वाची आहे असं राखी विक्रेता साक्षी दुसाने सांगते.
पिंपरी-चिंचवडमध्ये राखी विक्रेत्यांना कोरोनाचा फटका, 70 टक्के व्यवसाय ठप्प - राखी विक्रेते न्यूज
कोरोना महामारीमुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत, तर काही जणांचा व्यवसाय अत्यंत मंद गतीने वाटचाल करत असल्याचे पाहायला मिळत आहे. राख्या विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना कोरोनाचा जबर फटका बसला असून, 70 टक्के व्यवसाय ठप्प असल्याने राखी विक्रेते असमाधानी आहेत.