ETV Bharat / state

महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोनस मग आम्हाला का नाही; कंत्राटी कामगारांचा टाहो - Pimpri chinchwad city news

पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचाऱ्यांना 8.33 बोनस व 15 हजार सानुग्रह अनुदान एकरकमी देण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मान्यता दिली. पालिका कर्मचाऱ्यांना बोनस तर आम्हाला का नाही, असा टाहो कंत्राटी कामगारांनी फोटला.

कंत्राटी कर्मचारी
कंत्राटी कर्मचारी
author img

By

Published : Nov 1, 2020, 6:58 PM IST

Updated : Nov 1, 2020, 8:03 PM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे) - महापालिका कर्मचाऱ्यांना 8.33 टक्के बोनस आणि 15 हजार सानुग्रह अनुदान एकरकमी देण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे साडेआठ हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघ आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्यात पंचवार्षिक वेतन करार झाला आहे. या वेतन कराराचे हे अंतिम वर्ष आहे. दरम्यान, कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना मात्र ठेकेदार बोनस देत नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला असून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

बोलताना अध्यक्ष व कर्मचारी

कोरोना कालावधीत महापालिकेचे उत्पन्न घटल्याने कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानावर गंडांतर येण्याची चिन्हे होती. बोनसची हक्काची रक्कम देण्यास महापालिका आयुक्तांची मान्यता होती. तथापि, सानुग्रह अनुदान देण्यास त्यांची तयारी नव्हती. दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना सानुग्रह आणि बोनस देण्यात यावा, असे आदेश महापालिका आयुक्तांनी मुख्य लेखापाल जितेंद्र कोळंबे यांना दिले. कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे म्हणाले, महापालिकेचे उत्पन्न घटले असे आयुक्तांचे म्हणणे असले तरी पुढील तीन ते चार महिन्यांत उत्पन्न वाढीसाठी महापालिका कर्मचारी संपूर्ण योगदान देतील. पाच वर्षांचा करार झाला होता. हे शेवटचे वर्ष आहे. कोरोना काळात महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यानी प्रतिकूल परिस्थितीत काम केले. महानगर पालिकेने दिलेला बोनस हा मनोधैर्य वाढवणारा आहे. कोरोनाच्या काळात पालिकेच्या उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे पुढील काळात पालिकेचे सर्व कर्मचारी उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करतील. दिवाळी बोनसमुळे कर्मचाऱ्यामध्ये समाधानाच वातावरण आहे, असे ते म्हणाले आहेत.

आम्हाला बोनस का नाही सफाई कामगार महिलांचा टाहो -

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कायम कर्मचारी यांना 8.33 टक्के बोनस सह 15 हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे, याबाबत ची घोषणा महापौर आणि पदाधिकारी यांनी जाहीर केली, याबाबत माहिती मिळताच आणि ठेकेदारांनी दिवाळी देण्यास नकार दिल्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीने साफसफाईचे काम करणाऱ्या महिलांनी कामावरून सुट्टी होताच पिंपरी येथील कष्टकरी कामगार पंचायत कार्यालयात धाव घेतली. पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांची भेट घेऊन आणि बैठक घेऊन महापालिकेच्या दुजाभाव आणि भेदभाव केल्याप्रकरणी संताप व्यक्त केला, कायम कामगारांची दिवाळी गोड होत असतानाच गोरगरीब कष्टकरी महिलांची दिवाळी मात्र अंधकार मय होणार आहे.

आमच्या सोबत सावत्रपणाची वागणूक का? -
कायम व कंत्राटी पद्धतीने कामे करणाऱ्या कामगारांना बोनस देणे कायद्याने बंधन कारक आहे, या कायद्याची सर्वत्र अंमलबजावणी होत असताना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत मात्र कायदा पायदळी तुडवला जात आहे, याबाबत साफ सफाई कामगार महिला संगीता जानराव म्हणाल्या, कायम कामगारांना बोनस जाहीर झाला त्यांचे स्वागत आहे. परंतु, आमच्या सोबत सावत्रपणाची वागणूक का? महानगरपालिका प्रत्येक महिन्यात बीला सोबत ठेकेदारांना बोनसची रक्कम देते ठेकेदार आम्हाला बोनस देत नसतील तर यावर अंतिम निर्णय प्रशासन घेऊ शकत नाही. मधुरा डांगे म्हणाल्या आम्ही गलिच्छ अशा ठिकाणी हाताने घाण स्वच्छ करून, शहर स्वच्छ करतो, आमच्याही घरात दिवाळीचा दिवा उजळला पाहिजे यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही.

हेही वाचा - पिंपरी चिंचवडमध्ये टोळक्याकडून धुडगूस, दहा वाहनांची तोडफोड

Last Updated : Nov 1, 2020, 8:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.