पुणे : रविवारी पुण्यातील नवले पुलावर एका कंटेनरने 47 गाड्यांना उडवल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक अपघात झाल्याची घटना घडली. आज पुन्हा एकदा पुण्यातील नवले पुलावर अपघात ( Accident on Navale Bridge ) झाला आहे. भरधाव वेगात असणारा कंटेनर रस्त्याच्या मधील असणाऱ्या दुभाजकावर जाऊन धडकला आहे. या धडकेत २ गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
अतिक्रमण काढले - अपघात केलेला ट्रक कात्रजच्या दिशेने मुंबईकडे जात होता. रविवारी झालेल्या भीषण अपघातनंतर आज पुन्हा त्याच ठिकाणी हा अपघात झाला आहे. विशेष म्हणजे आज प्रशासनाच्या माध्यमातून नवले ब्रीज येथील जो सर्व्हिस रोड आहे, तेथील अतिक्रमण हे काढण्यात आले आहे.