पुणे - उत्तर प्रदेशात राहुल गांधी यांना पोलिसांनी केलेल्या अटकेचे पडसाद आता राज्यभरात उमटू लागले आहेत. पुण्यातही शहर काँग्रेसच्यावतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी योगी आदित्यनाथ, नरेंद्र मोदी यांचा फोटो जाळून निषेध करण्यात आला. पुण्यातील बालगंधर्व चौकात काँग्रेसकडून जोरदार आंदोलन करण्यात आले.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी निघालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांकडून त्यांना धक्काबुक्कीही झाली. याबाबत महाराष्ट्रातील नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती बांधून केंद्र सरकारच्या आणि योगी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. हाथरस येथील पीडितेला न्याय देऊन आरोपींना फाशी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. राहुल गांधी यांना दिलेली वागणूक ही तानाशाही असल्याची टीका कॉंग्रेसने केली आहे.
हेही वाचा - पुण्यात विविध मागण्यांसाठी असंघटित कामगार विकास परिषदेचे 'ताटली' आंदोलन