ETV Bharat / state

राज्यपालांच्या भूमिकेविषयी संभ्रम - राजू शेट्टी

बहुतांश शहरातील कृषी उत्पन्न बाजार समित्याच्या जागा शहरातील मध्यवर्ती भागात आहेत. या जागांवर कुणाचा तरी डोळा पडला असेल. म्हणूनच तर कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद करण्याचा विचार नाही ना? अशी शंका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उपस्थित केली.

राजू शेट्टी
author img

By

Published : Nov 18, 2019, 2:24 PM IST

Updated : Nov 18, 2019, 3:21 PM IST

पुणे - आपले धोरण ठरवत असताना राज्यपालांनी आधीच्या सरकारने ठरविलेल्या धोरणाला फाटा देऊन वेगळं धोरण कसे काय राबविले. त्यामुळे राज्यपालांच्या भूमिकेविषयीच माझ्या मनात संभ्रम असल्याचे स्वाभिमान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सांगितले. पुण्यातील पत्रकार भवन येथे आज राजू शेट्टी यांच्यासोबत वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

राजू शेट्टी

हेही वाचा- ...आता येथून पुढे 'नो कॉमेंट्स' - अजित पवार

राजू शेट्टी म्हणाले, राष्ट्रपती राजवट लागू होण्याच्या आधी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन अवकाळी पावसामुळे शेतमालाच्या झालेल्या नुकसानीची कल्पना दिली होती. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यातून अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याचे सांगितले होते. केंद्रांचे पथक येऊन शेतीची पाहणी करणार होतं. अजून तेसुद्धा आले नाही. अशा परिस्थितीत राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची घाई का केली?, असा प्रश्न राजू शेट्टी यांनी उपस्थित केला.

कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या जागांवर सरकारचा डोळा ?
बहुतांश शहरातील कृषी उत्पन्न बाजार समित्याच्या जागा शहरातील मध्यवर्ती भागात आहेत. या जागांवर कुणाचा तरी डोळा पडला असेल. म्हणूनच तर कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद करण्याचा विचार नाही ना? अशी शंका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उपस्थित केली.

बाजार समित्या बरखास्त करण्यापूर्वी आधी पर्यायी व्यवस्था निर्माण करा. पर्यायी व्यवस्था नसेल, तर कसे होणार माहिती नाही, शेतकऱ्यांकडे साडेतीन क्विंटल सोयाबीन, वांगी असतील, तर तो ऑनलाइन ट्रेडिंग कसे करेल. बाजार समितीत दोष आहेत. भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी घरात ढेकणे झाली म्हणून घर जाळणे योग्य नाही.

आर्टिकल 370 रद्द झाल्यामुळे काश्मिरी जनतेवर फारसा फरक नाही
आर्टिकल 370 रद्द केल्यामुळे काश्मिरी जनता फारशी आनंदी नसली तरी त्यांना याविषयी काही पडलेलेही नाही. फक्त सरकारने आम्हाला विश्वासात घेऊन हा निर्णय घ्यायला पाहिजे होता, असे श्रीनगरमधील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. काश्मिरी नेते अटकेत आहेत. त्यांना त्यांचेही काही फरक पडला नाही.

Intro:राज्यपालांच्या भूमिकेविषयी संभ्रम - राजू शेट्टी

आपले धोरण ठरवत असताना राज्यपालांनी आधीच्या सरकारने ठरविलेल्या धोरणाला फाटा देऊन वेगळं धोरण कसे काय राबविले. त्यामुळे राज्यपालांच्या भूमिकेविषयीच माझ्या मनात संभ्रम असल्याचे स्वाभिमान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सांगितले. पुण्यातील पत्रकार भवन येथे आज राजू शेट्टी यांच्यासोबत वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

राजू शेट्टी म्हणाले, राष्ट्रपती राजवट लागू होण्याच्या आधी हंगामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन अवकाळी पावसामुळे शेतमालाच्या झालेल्या नुकसानीची कल्पना दिली होती. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यातून अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याचे सांगितले होते. केंद्रांचे पथक येऊन शेतीची पाहणी करणार होतं. अजून तेसुद्धा आले नाही..अशा परिस्थितीत राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची घाई का केली? असा प्रश्न राजू शेट्टी यांनी उपस्थित केला. Body:कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या जागांवर सरकारचा डोळा ?

बहुतांश शहरातील कृषी उत्पन्न बाजार समित्याच्या जागा शहरातील मध्यवर्ती भागात आहेत. या जागांवर कुणाचा तरी डोळा पडला असेल आणि म्हणूनच तर कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद करण्याचा विचार नाही ना? अशी शंका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उपस्थित केली.

बाजार समित्या बरखास्त करण्यापूर्वी आधी पर्यायी व्यवस्था निर्माण करा. पर्यायी व्यवस्था नसेल, तर कसे होणार माहिती नाही, शेतकऱ्याकडे साडेतीन क्विंटल सोयाबीन, वांगी असतील, तर तो ऑनलाइन ट्रेडिंग कसे करेल..बाजार समितीत दोष आहेत, भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी घरात ढेकणे झाली म्हणून घर जाळणे योग्य नाही.
Conclusion:आर्टिकल 370 रद्द झाल्यामुळे काश्मिरी जनतेवर फारसा फरक नाही...

आर्टिकल 370 रद्द केल्यामुळे काश्मिरी जनता फारशी आनंदी नसली तरी त्यांना याविषयी काही पडलेलेही नाही..फक्त सरकारने आम्हाला विश्वासात घेऊन हा निर्णय घ्यायला पाहिजे होता असे श्रीनगरमधील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. काश्मिरी नेते अटकेत आहेत..त्यांना त्यांचेही काही फरक पडला नाही...

Last Updated : Nov 18, 2019, 3:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.