ETV Bharat / state

लग्नाचे आमिष दाखवत बारामती तालुक्यात युवतीवर अत्याचार - physical abuse news

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंधासाठी त्याचा वापर केल्याचे लक्षात आल्यानंतर तिने त्याच्याविरोधात अत्याचाराचीही तक्रार दाखल केली.

बारामती
बारामती
author img

By

Published : Dec 3, 2020, 4:02 PM IST

बारामती - युवतीला लग्नाचे अमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी अरविंद कौशल्य पटेल (सध्या रा. घाडगेवस्ती. बयाजीनगर, बारामती, मूळ रा. कुरलीखांड, जि. सिद्धी, मध्य प्रदेश) याच्याविरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रेमाचे जाळे फेकत मिळवला मोबाईल क्रमांक

अधिक माहितीनुसार, पीडित युवती मूळची दौंड येथील आहे. ती एमआयडीसी भागात मामे बहिणीकडे राहत होती. हे दोघे येथील एका कंपनीत काम करत होते. त्यांच्या शेजारीच पटेल हा आई-वडील भावासह राहत होता. दरम्यान, त्याने युवतीवर प्रेमाचे जाळे फेकत तिचा मोबाईल क्रमांक मिळवला. नंतर तिच्याशी बोलणे सुरू केले. तिला आपल्या प्रेमात ओढल्यानंतर फेब्रुवारी २०२०मध्ये तू मामे बहिणीला सोडून माझ्यासोबत रहा, आपण लवकरच लग्न करू, असे आश्वासन दिले. त्यावर विश्वास ठेवून ती एमआयडीसीतील रुई भागात त्याच्यासोबत एका खोलीत राहू लागली. त्यादरम्यान त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिने लग्नाची विचारणा केल्यावर सध्या पैसे नाहीत, पैसे आले की करू, असे तो सांगत होता.

मारहाणही केली

वारंवार विचारणा केल्यावर त्याने दारू पिऊन येत तिला वेळोवेळी मारहाण केली. त्यानंतर (दि. ११ नोव्हेंबर रोजी) तो कंपनीत कामाला जातो, असे सांगून घरातून गेला, तो परतला नाही. त्यामुळे युवतीने तो हरवल्याची फिर्याद तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली होती. परंतू त्याने लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंधासाठी त्याचा वापर केल्याचे लक्षात आल्यानंतर तिने त्याच्याविरोधात अत्याचाराचीही तक्रार दाखल केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.