ETV Bharat / state

मुंबईतील बनावट सॅनिटायझरचा कारखाना उद्ध्वस्त; दोघांना अटक

पोलिसांना अटक केलेल्या दोन आरोपींकडून साकिनाका येथे बनावट सॅनिटायझरचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्याआधारे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने साकिनाका येथील कारखान्यावर छापा टाकून ३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

fake sanitizer pune
अटक केलेले आरोपी
author img

By

Published : Mar 15, 2020, 8:14 PM IST

पुणे- सरकारने हँड सॅनिटायझरचा समावेश अत्याश्यक वस्तूंमध्ये केला आहे. त्यामुळे, त्याची मागणी वाढली आहे. मात्र, याचा फायदा घेत शहरातील काही लोकांनी बनावट सॅनिटायझरचा साठा तयार केला होता. या लोकांवर अन्न व औषध प्रशासन विभाग आणि शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा पथकाने कारवाई केली आहे. या पथकाने मुंबईतील साकिनाका येथील घरातच बनावट सॅनिटायझर तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून ३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर

पोलिसांनी शनिवारी दत्तवाडी परिसरात बनावट सॅनिटायझर बनवणाऱ्या अजय शंकरलाल गांधी, मोहन चौधरी, सुरेश छेडा या तीन व्यक्तींना अटक केली होती. या तिघांची विचारपूस केल्यानंतर पराग दोषी आणि हरेश बेरा, या दोघांची नावे समोर आली. पोलिसांनी आज या दोघांना अटक करून अधिक चौकशी केली असता मुंबईतील साकिनाका येथे बनावट सॅनिटायझरचा कारखाना सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने साकिनाका येथील कारखान्यावर छापा मारला.

साकिनाका येथील एका घरात हा कारखाना चालत होता. त्यासाठी पराग दोषी आणि हरेश बेरा या गुन्हेगारांनी रिकाम्या बाटल्या आणि नामांकित कंपन्यांचे स्टिकर वापरले होते. आरोपींनी मुंबईतील एका कंपनीतून ५ लिटरचे कॅन आणले व त्यातून छोट्या बाटल्या तयार केल्या होत्या. नंतर या सॅनिटायझरच्या बाटल्या शहरातील लोकल मार्केटमध्ये विकण्यात आल्या होत्या. दरम्यान, कोरोनाचा फायदा घेत हे रॅकेट उदयास आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणी न्यायालयाने अटक केलेल्या ५ ही आरोपींना ३ दिवसांची कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा- पुण्यातील लाकडी फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग; जीवितहानी नाही

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.