पुणे - एका कंपनीचा ई-मेल आयडी हॅक करून तब्बल 14 लाख 59 हजार रुपये अज्ञातांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. 'अॅस्टेक टुलिंग्ज अँड स्टॅम्पिंग प्रायव्हेट लिमिटेड' असे या कंपनीचे नाव आहे. कंपनीची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - पीकविम्याच्या पैशासाठी बीडच्या शेतकऱ्यांचे पुण्यात आंदोलन, खात्यात पैसे जमा झाल्याशिवाय जाणार नसल्याचा इशारा
रवी रघुनाथलाल गेरा यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने ऑक्टोबर महिन्यात 18 ते 24 या तारखेच्या कालावधीत अॅस्टेक टुलिंग्ज अँड स्टॅम्पिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा ई- मेल आयडी हॅक केला. त्याद्वारे मॅक स्टील इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला ई-मेल केला. त्या मेलमधून आरोपीने पंजाब नॅशनल बँकेच्या एका खात्यावर पैसे पाठवण्यास सांगितले. त्यानुसार मॅक स्टील कंपनीने त्याच्यावर विश्वास ठेवत तब्बल 14 लाख 59 हजार रुपये पाठवले, अशा पद्धतीने त्याने आर्थिक फसवणूक केली. या बाबत एमआयडीसी भोसरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा - ऑनलाईन बिंगो मटक्यावर छापा; बारामती क्राईम ब्रँचची कारवाई