ETV Bharat / state

'कमी आमदार असतानाही भाजपवर मात'

सहकार क्षेत्र आणि राजकारण वेगळं केलं जाऊ शकत नाही. कारण अनेक राजकीय नेत्यांनी सहकार क्षेत्र मजबूत केलं आहे. साखर कारखानदारी आणि साखर क्षेत्राने अनेक नेते दिले असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

cm uddhav thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
author img

By

Published : Dec 25, 2019, 2:38 PM IST

पुणे - कमी आमदार असतानाही भाजपवर मात केली असून हे सरकार बनवण्यासाठी शरद पवारांचा चमत्कार कामी आल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 43 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज(बुधवार) पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऊस भूषण पुरस्कारांचे यावेळी वितरण करण्यात आले.

हेही वाचा - कोल्हापुरात विक्रीचे नियम न पाळल्याने पहिल्यांदाच मटण दुकानावर कारवाई

शेतकऱ्यांच्या आयुष्याचं चिपाड होऊ देणार नाही

सहकार क्षेत्र आणि राजकारण वेगळं केलं जाऊ शकत नाही. कारण अनेक राजकीय नेत्यांनी सहकार क्षेत्र मजबूत केलं आहे. साखर कारखानदारी आणि साखर क्षेत्राने अनेक नेते दिले असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. एक ऊस मोडू शकतो मात्र, मोळी मोडू शकत नाही. तसेच शेतकरी कर्जमुक्तीसाठी सध्या 2 लाखांपर्यंतची मर्यादा असून त्यापुढील कर्जमाफीसाठी विचार सुरू आहे. शेतकऱयांसाठी अनेक योजना प्रत्यक्षात राबवणार आहोत. आज ग्रामीण अर्थव्यवस्था शेतकऱ्यावर अवलंबून आहे. दुसऱ्याच्या आयुष्यात गोडवा वाटत असताना शेतकऱ्याच्या आयुष्याचं चिपाड होत आहे. जर राज्यकर्त्यांनी आम्ही याकडे लक्ष दिलं नाही तर या कार्यक्रमाला काही अर्थ नसल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

हे सरकार शेतकऱ्यांसाठी पाठीराखा म्हणून काम करेल. शेतकऱयांना सर्वच कर्जमुक्तीच्या चिंतेतून दूर करणार आहोत. तसेच अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी शेतकरी मजबूत होणं गरजेचं असल्याचं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार, हर्षवर्धन पाटील, मंत्री जयंत पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, रोहित पवार, दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांसह साखर कारखानदार व ऊस उत्पादक शेतकरी यावेळी उपस्थित होते.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.