ETV Bharat / state

CM Eknath Shinde : नवले ब्रिज अपघात कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला? तात्काळ शोधण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश - Navale Bridge Accident

पुण्यातील नवले पुलावर रविवारी रात्री भीषण अपघात ( Accident on Navale bridge in Pune ) झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातातील जखमींना योग्य ते उपचार मिळण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देखील स्थानिक प्रशासनाला दिल्या असून या अपघातामुळे सदर भागात झालेल्या वाहतूक कोंडी दूर करून वाहनधारकांना त्रास होणार नाही. याची दक्षता घेण्याचे निर्देश देखील वाहतूक पोलिसांना दिले आहेत. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्विटद्वारे ( CM Eknath Shinde Tweet ) सांगितले.

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
author img

By

Published : Nov 21, 2022, 7:16 AM IST

पुणे : पुण्यातील नवले ब्रिज येथे रात्री टँकरच्या धडकेने झालेल्या अपघातात ( Accident on Navale bridge in Pune ) अनेक वाहने दुर्घटनाग्रस्त झाली. या अपघाताची माहिती कळताच तो नक्की कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला ते शोधण्याचे तात्काळ निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

नवले ब्रिज येथे झालेल्या अपघातातील जखमींना योग्य ते उपचार मिळण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत. अपघातामुळे सदर भागात झालेल्या वाहतूक कोंडी दूर करून वाहनधारकांना त्रास होणार नाही. याची दक्षता घेण्याचे निर्देश देखील वाहतूक पोलिसांना दिले आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी ट्विट केले आहे. ( Navale Bridge Accident )

  • या अपघातातील जखमींना योग्य ते उपचार मिळण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देखील स्थानिक प्रशासनाला दिल्या असून या अपघातामुळे सदर भागात झालेल्या वाहतूक कोंडी दूर करून वाहनधारकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देखील वाहतूक पोलिसांना दिले आहेत.

    — Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अपघातात 30 गाड्यांचे नुकसान : या भीषण अपघातात 30 गाड्यांचे नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या त्यांच्याकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. नर्हे परिसरात अपघात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

गाड्या एकमेकांवर आदळल्याची माहिती : कंटेनरच्या धडकेने या सर्व गाड्या एकमेकांवर आदळल्याची माहिती आहे. या अपघातात एकूण 47 गाड्यांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, येथील नेमकी माहिती लवकरच समोर येईल. त्यानंतरच आर्थिक नुकसान व जीवितहानी याचा अचूक अंदाज बांधता येईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.