ETV Bharat / state

Chitra Wagh : उर्फी प्रकरणावरून चित्रा वाघ यांनी साधला रुपाली चाकणकरांवर निशाणा, म्हणाल्या... - Chitra Wagh Criticize Rupali Chakankar

उर्फी प्रकरण ( Urfi case ) हा प्रश्न समाज स्वास्थ्याचा आहे. या प्रकरणावर बोलण्यासाठी आम्ही काय गुळ खोबरं घेऊन आमंत्रण द्यायला गेलो नव्हतो, असे म्हणत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर ( Rupali Chakankar ) यांच्यावर भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ ( Chitra Wagh Criticize Rupali Chakankar ) यांनी निशाणा साधला आहे. त्या पुण्यात बोलत होत्या.

Chitra Wagh Criticize Rupali Chakanka
चित्रा वाघ
author img

By

Published : Jan 7, 2023, 8:51 PM IST

चित्रा वाघ प्रतिक्रिया देताना

पुणे - उर्फी प्रकरणावरून ( Urfi case ) महिला आयोगाला टार्गेट केले म्हणून रूपाली चाकणकर ( Chitra Wagh Criticize Rupali Chakankar ) यांनी पत्रकार परिषद घेऊन चित्रा वाघ वेगवेगळ्या भूमिका घेत असल्याचा आरोप केला होता. त्यात अनेक आरोप करण्यात आल्यानंतर आता चित्रा वाघ ( Chitra Wagh ) यांनी पत्रकार घेऊन हे सगळ्या आरोपाला उत्तर दिलेला आहे.

उर्फीचा नंगा नाच - रूपाली चाकणकर म्हणजे आयोगाचा अध्यक्ष म्हणजे आयोग नाही. त्यामध्ये इतर सात सदस्य असतात. त्यांची संमती घ्यावी लागते. मला नोटीस पाठवण्याच्या आधी तुम्ही राज्याचे पोलीस डिजी यांची परमिशन घेतली का? आयोग काय काम करतोय याची आधी आम्हाला कल्पना आहे. आम्ही काम केले. त्यामुळे मी म्हणजे आयोग या भ्रमात रूपाली चाकणकर याने राहू नये असे इशाराही त्यांनी दिलेला आहे. उर्फीचा नंगा नाच चाललेला आहे .तो आम्ही सहन करणार नाही. दिसेल तिथे फटकावणारच असे चित्रा वाघ म्हणाल्या.

राज्य महिला आयोगाचा माझ्यावर राग - यात राजकीय अकास काय आहे? राज्य महिला आयोगाने अकसा पोटी म्हणून माझ्यावर आरोप केले? जर महिला आयोग योग्य काम करत असतं तर, अजित दादा पवार जे म्हणाले की, आम्ही महिलांना संधी देतो. त्याचं सोनं करायचं का माती हे त्यांच्या हातात आहे. याची माती होत आहे हे अजित दादांच्या लक्षात आलेला आहे. त्याचबरोबर सुप्रिया सुळे या मोठ्या नेत्या आहेत. त्याने सुद्धा वादविवाद थांबवले पाहिजेत असे म्हटलेल आहे. त्यामुळे त्यांना चांगलं कळतं की कुठे थांबलं पाहिजे. पण यांना कसं कळत नाही हाच प्रश्न असल्याचेही त्या म्हणाले आहे.

उर्फीला आयोगाचा पाठिंबा - जर रस्त्यावर भेटली तर तिला आम्ही फटकावणार हा नंगानाच आम्ही चालू देणार नाही. हा प्रश्न राजकीय नाही तर हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आहे. त्या अगोदर एक संधी म्हणून तिला साडीचोळी सुद्धा आम्ही पाठवू. जे काही वैयक्तिक स्वातंत्र्य आहे म्हणून आयोग जी मुलगी नंगानाच करते त्याला पाठीशी घालते आहे. आवाज उठवते त्यालाच आयोग नोटीस पाठवते हे कसे शक्य आहे.

रूपाली चाकणकरांना चित्रा वाघ यांचा इशारा - ज्या सावित्रीमाईने आम्हाला लिहायला शिकवलं घडवलं त्याच सावित्रीबाईच्या लेकी म्हणून घेतात. अशा नंगानाच करणाऱ्या मुलीचे समर्थन करतात हे सावित्रीबाईंना तरी योग्य वाटले असतं का? याचा विचार चाकणकरांनी केला पाहिजे. तुम्ही आता या प्रकरणात उडी घेतलीच आहे. तुम्ही आम्हाला उत्तरे दिलेच आहेत तर हरकत नाही. आता तुम्ही चाळीस उत्तरे ऐकायची तयारी ठेवा तुम्ही एक प्रश्न विचारला आम्ही 40 प्रश्न चे उत्तरे तुम्हाला देऊ अशा इशारा रूपाली चाकणकरांना चित्रा वाघ यांनी दिलेला आहे.

वाद संपणार नाही - इतके दिवस मी तुमच्या कामकाजाबद्दल बोललो नव्हते. माझा आयोगाला विरोध नाही परंतु आयोगाच्या अध्यक्षला आहे. त्याच्या कार्यपद्धतीला विरोध आहे. आता यापुढे मी तुमचे सगळे कार्यपद्धती विषयी बोलेन. तुम्ही आता बोललाच आहात तेवढा संयम ठेवून ऐकायलाही शिका असं म्हणत यापुढेही वाद संपणार नाही असा इशाराच आता चित्र वाघ यांनी दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.