पुणे: कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना आजपासून लस देण्यास सुरुवात करण्यात येणार होती. मात्र पोर्टल अपडेट न झाल्याने आज लसीकरण होऊ शकलेले नाही. पुण्यातील कमला नेहेरू रुग्णालयात लसीकरणाची तयारी करण्यात आली होती. रुग्णालयात येणारया मुलाचे नाव नंबर लिहून परत पाठवण्यात येत आहे.
पुण्यात 29 केंद्रावर लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. 15 मार्च 2010 या दिवशी किंवा त्यापूर्वी जन्मलेल्या मुलांना ही लस घेता येणार आहे त्यासाठी पुणे शहरातील 29 केंद्रावर प्रत्येकी 150 डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ऑनलाइन आणि प्रत्यक्ष केंद्रात जाऊन अशा पद्धतीने 50 - 50 टक्के लसीचे वाटप करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. जेव्हा पोर्टल अपडेट होईल तेव्हा लसीकरण सुरू करण्यात येईल. असे सांगितले जात असले तरी लसीकरण केंद्रावर त्या तुलनेत शुकशुकाट पाहायला मिळाला.
हेही वाचा : Milk is expensive : दूध महागल! पुण्यात दुधाच्या किमतीत 2 रुपयांनी वाढ