ETV Bharat / state

बोअरवेलमध्ये अडकलेल्या मुलाला दोन तासात काढले बाहेर, मुलगा सुखरूप

मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

बोअरवेलमध्ये अडकलेल्या चिमुकल्याला सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.
author img

By

Published : Apr 21, 2019, 4:00 PM IST

पुणे - शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे पाण्यासाठी खोदलेल्या बोअरवेलमध्ये अडकलेल्या दोन वर्षांच्या चिमुकल्याला पोलीस, आग्निशामक दल व स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. सार्थक राहूल धोत्रे (वय २ वर्ष, मुळ गाव माऊली नगर, ता. आष्टी, जिल्हा बीड) असे मुलाचे नाव आहे.

आज सकाळी कारेगाव येथील दादाभाऊ नवले यांच्या १५ फुट खोल बोअवेलमध्ये सार्थक खेळत असताना पडला होता. त्याला पोलीस आणि एमआयडीसी अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले आहे. यासाठी बोअरवेलच्या बाजुने समांतर खड्डा घेण्यात आला होता. सार्थकला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सध्या तापमानात प्रंचड वाढ झाली असून पाण्याची मोठी टंचाई भासत आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने जमिनीत बोअरवेल घेतले जात आहेत. मात्र, पाणी न लागल्याने बोअरवेल तसेच उघडे सोडून दिले जात आहेत. लहान मुले खेळत असताना या उघड्या बोअरवेलमध्ये पडण्याच्या घटना घडत आहेत.

Intro:Anc__शिरुर तालुक्यातील कारेगाव येथे पाण्यासाठी घेतलेल्या बोअरवेल मध्ये अडकलेल्या दोन वर्षाच्या चिमुकल्या मुलाला पोलीस व आग्निशामक दल,स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे सार्थक राहूल धोत्रे वय 2 वर्ष कारेगाव मुळ गाव रां.माऊली नगर ता. आष्टी जिल्हा बीड.

आज सकाळज्या सुमारास कारेगाव येथील दादाभाऊ नवले यांच्या बोअवेल मध्ये सुमारे 15 फुट खोलीवर दोन वर्षीय चिमुकला मुलगा खेळत असताना बोअरवेलमध्ये अडकल्याची घटना घडली होती पोलीस, स्थानिक नागरिक,MIDC अग्निशामक दलाचे जवान यांनी चिमुकल्याला वाचविण्यासाठी बोअरवेल बाजुने समांतर खड्डा घेऊन सार्थकला सुखरुप बाहेर काढण्यात यश आले असुन प्रथमोपचार करण्यासाठी रुग्नालयात दाखल करण्यात आले असुन सार्थकची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सध्या उन्हाचा कडाका असुन पाण्याची मोठी टंचाई असताना मोठ्या संख्येने जमिनीत बोअरवेल घेतले जातात मात्र पाणी न लागल्याने बोअरवेल तसेच सोडुन दिली जात आहे याच बोअरवेलच्या परिसरात असण्या-या दगडी वाळुवर लहान मुलांचा खेळ सुरु असतो याकडे दुर्लक्ष झाले तर अशा दुर्दैवी घटना घडत आहे.Body:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.