ETV Bharat / state

One Nation one election : संपूर्ण देशात एकाचवेळी निवडणूक घेण्याची केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी - One Nation One Election

गेल्या काही वर्षांपासून देशात वन नेशन वन इलेक्शन ( One Nation One Election ) अशी चर्चा सुरू आहे यावर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना विचारला असता ते म्हणाले की लोकसभा आणि विधासनभा निवडणुका संपूर्ण देशात एकाचवेळी घेण्याची केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी ( Preparations for Lok Sabha Vidhan Sabha election ) आहे.

One Nation one election
मुख्य निवडणुक आयुक्त राजीवकुमार
author img

By

Published : Nov 10, 2022, 9:24 AM IST

Updated : Nov 10, 2022, 9:29 AM IST

पुणे : गेल्या काही वर्षांपासून देशात वन नेशन वन इलेक्शन ( One Nation One Election ) अशी चर्चा सुरू आहे यावर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना विचारला असता ते म्हणाले की लोकसभा आणि विधासनभा निवडणुका संपूर्ण देशात एकाचवेळी घेण्याची केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी ( Preparations for Lok Sabha Vidhan Sabha election ) आहे. मात्र, हा धोरणात्मक निर्णय असून तो केंद्र सरकारच्या अखत्यारित आहे. परिणामी याबाबतचा निर्णय केंद्र सरकारने घ्यायचा आहे. असे देशाचे मुख्य निवडणूक आयूक्त राजीव कुमार यांनी बुधवारी पुण्यात ( Chief Election Commissioner Rajeev Kumar ) सांगितले.

निवडणूक आयुक्त पुणे दौऱ्यावर : मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार पुणे दौऱ्यावर आहेत. आज त्यांची पुण्यातील विभागीय आयुक्त येथे पत्रकार परिषदा आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते. यावेळी निवडणूक आयूक्त अनुपचंद्र पांडे, निवडणुक आयोगाचे विशेष अधिकारी डॉ. रणबीर सिंह, निवडणूक उपायुक्त हिरदेश कुमार, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, निवडणुक आयोगाच्या माध्यम व संवाद महासंचालक शेफाली शरण या वेळी उपस्थित ( Rajeev Kumar On One Nation One Election ) होत्या.

तृतीयपंथी घटकांच्या समस्यांबाबत संवेदनशीलता : निवडणूक प्रक्रियेबाबतच्या तृतीयपंथी घटकांच्या समस्यांबाबत संवेदनशीलता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच त्यांना आपले म्हणणे, समस्या मांडण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून एक डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जाईल. तसेच तृतीयपंथीयांच्या मतदार नोंदणीसाठी प्रकिया अतिशय सोपी केली असून तंत्रज्ञान, जन्म दाखला आदी समस्यांवर मार्ग काढला जाईल. प्रत्येक राज्यात तृतीयपंथी मतदारांशी संवाद साधत आहोत. निवडणूक प्रकियेच्या अनुषंगाने तृतीयपंथींयासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याबाबत आयोग आवश्यक ती कार्यवाही करेल, असे यावेळी राजीवकुमार म्हणाले.

प्रत्येकाला सामावून घेण्याचा आयोगाचा प्रयत्न : आगामी निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रत्येक घटकाला सामावून घेण्याचा आयोगाचा प्रयत्न आहे. तरुणांपासून तृतीयपंथांनाही यात सामावून घेण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे मतदार यादी, मतदान प्रक्रिया या दोन्ही पारदर्शक आणि सर्वसमावेश करण्याचा मानस आहे. मतदानाच्या दिवशी औद्योगिक कंपन्यांना सुट्टी जाहीर केली जाते. मात्र, मतदार त्या सुट्टीचा आनंद घेत मतदानाकडे पाठ फिरवितात. त्यामुळे उद्योजक, विद्यापीठे, विविध स्वयंसेवी संस्था, संघटनांशी आम्ही संवाद साधत असून त्यांच्यात मतदान प्रक्रियेबाबत जनजागृती करीत असल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले.

Last Updated : Nov 10, 2022, 9:29 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.