ETV Bharat / state

'सुटाबुटातल्या सरकारमुळे देशाची अवस्था अतिदक्षता विभागातल्या रुग्णासारखी' - अर्थसंकल्प

'देशाचा विकास दर घसरला असून परदेशी निधी आणि गुंतवणूक कमी झाली आहे. उद्योग बंद पडत आहे. अर्थव्यवस्था कोलमडली आहे. आर्थिक मंदीमुळे उद्योग तोट्यात असून बेरोजगारी वाढली आहे'

chidambaram
माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम
author img

By

Published : Feb 7, 2020, 8:44 PM IST

Updated : Feb 7, 2020, 10:13 PM IST

पुणे - अतिदक्षता विभागातील रुग्णासारखी सध्या देशाची अवस्था झाली आहे. त्यावर वेळेत औषधोपचार करावे लागतील, अशी चिंता माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी व्यक्त केली. सुटाबुटातले हे सरकार असून सामान्य लोकांच्या हातात ते पैसे येऊ देत नाहीत, असाही आरोप त्यांनी यावेळी केला.

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम

हेही वाचा - केरळ सरकारने अर्थसंकल्पाच्या मुखपृष्ठावर छापले गांधींच्या हत्येचे छायाचित्र

देशातली आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी विशिष्ट वर्गाच्या हाती पैसे एकवटले जाऊ नये, असेही ते यावेळी म्हणाले. पुणे काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अर्थसंकल्पासह त्यांनी एनआरसी आणि सीएएवरही भाष्य केले. या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्यमंत्री विश्वजित कदम, बाळासाहेब शिवरकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा - रांजणगावमध्ये कार्यक्रमात मराठी अभिनेत्रीसोबत अश्लील वर्तन, मुंबईत गुन्हा दाखल

'देशाचा विकास दर घसरला असून परदेशी निधी आणि गुंतवणूक कमी झाली आहे. उद्योग बंद पडत आहे. अर्थव्यवस्था कोलमडली आहे. आर्थिक मंदीमुळे उद्योग तोट्यात असून बेरोजगारी वाढली आहे' अशी टीका यावेळी चिदंबरम यांनी केली. सरकार या प्रश्नांवर उपाययोजना करत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

हेही वाचा - 'सैन्यदलाच्या सुविधा मिळाल्याने शस्त्रास्त्रे वेगाने विकसित होण्यात मदत होणार'

चुकीच्या पद्धतीने नोटबंदी आणि जीएसटी राबवले गेल्याने अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. लोकांच्या हातात पैसे नसल्याने क्रयशक्ती कमी होऊन उद्योग व्यवसाय डबघाईला आले आहेत. यामुळे सरकारची विश्वासहर्ता शून्यावर आली असल्याचे ते म्हणाले.

Intro:हे सरकार सुटा बुटातलं, सामान्यांच्या हाती पैसे येवूच देत नाही - पी. चिदंबरम (फाईल फोटो वापरा, बाईट थोड्याच वेळात पाठवतो)

अतिदक्षताविभागातील रुग्णासारखी सध्या देशाची अवस्था झाली आहे. त्यावर वेळेत औषधोपचार करावे लागतील. ही परिस्थिती बदलण्यासाठी सामान्य लोकांच्या हातात पैसे आले पाहिजे केवळ विशिष्ट वर्गाचे हाती पैसे एकवटले जाऊ नयेत. हे सरकार सुटा-बुटातलं सरकार असून सामान्य लोकांच्या हातात ते पैसे येवू देत नाही असा आरोप माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांनी शुक्रवारी केंद्र सरकार वर केला.

पुणे काँग्रेस कमिटीचे वतीने आयोजित एनआरसी, सीएए विरोध आणि केंद्रीय अर्थसंकल्प या विषयावर ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्यमंत्री विश्वजित कदम, बाळासाहेब शिवरकर आदी उपस्थित होते.

चिदंबरम म्हणाले, देशाचा विकासदर घसरलेला आहे, परदेशी निधी आणि गुंतवणूक कमी झाली आहे, उद्योग बंद पडत आहे, अर्थव्यवस्था कोलमडली आहे, आर्थिक मंदीमुळे उद्योग तोट्यात जात आहे, बेरोजगारी वाढली आहे, नोकऱ्या जात आहे पण सरकार हे मान्य करत नाही, कोणत्या उपाययोजना त्याबाबत करत नाही आणि बोलत पण नाही. चुकीच्या पद्धतीने नोटबंदी आणि जीएसटी राबवली गेल्याने अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. लोकांचे हातात पैसे न राहिल्याने क्रयशक्ती कमी होऊन उद्योग व्यवसाय डबघाईला आले आहेत. सरकारचे अर्थसंकल्पाबाबत सर्व क्रमांक संशयित आहेत, त्यामुळे सरकारची विश्वासहर्ता शून्यवार आली आहे.

ते पुढे म्हणाले, 1400 कोटी रुपये खर्च करून नागरिकत्व कायदा आसाम मध्ये प्रथम राबवला आणि 40 लाख लोकांकडे कागदपत्रे नसल्याचे दिसून आले, त्यानंतर पुन्हा हा कायदा राबवला असता 19 लाख लोक निर्वासित असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. फक्त पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यातील लोकांना देशात प्रवेश नाही सरकारने सांगितले पण इतर शेजारी देशाबाबत सरकार काही बोलत नाही. केवळ मुस्लिमांना लक्ष्य करत भेदभाव सरकार करत आहे. मुस्लिम सारखे दुसऱ्या देशातून बेकायदेशीर देशात येणाऱ्या हिंदू, बुद्ध लोकांना हाच कायदा असला पाहिजे.
Body:।।।Conclusion:।।।
Last Updated : Feb 7, 2020, 10:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.